खेड-संक्षिप्त पट्टा

खेड-संक्षिप्त पट्टा

कुर्धेत आज प्रथमच
नववर्ष स्वागत यात्रा
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील स्वागत यात्रा नियोजन समितीतर्फे गावामध्ये यावर्षी प्रथमच हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा गुढीपाडव्यानिमित्त पावस परिसरामध्ये प्रथमच काढण्यात येत आहे. बुधवारी (ता. २२) दुपारी ३ ते ५ या दरम्यान ही यात्रा काढण्यात येणार आहे. कुर्धे बंडबेवाडी, शिंदेवाडी, कुर्धे हायस्कूल सभागृह या मार्गाने यात्रा काढण्यात येणार आहे. लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात, पारंपरिक वेषात आणि जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज राहण्याचा निर्धार करावा, असे आवाहन स्वागतयात्रा नियोजन समितीने केले आहे.

------
हरियाणातील स्पर्धेसाठी
सिद्धी चाळकेची निवड
खेड ः तालुक्यातील सुकीवली येथील सिद्धी राजेंद्र चाळके या गुणवंत खेळाडू हिची हरियाणा येथे होणाऱ्या ६९ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे. भरणे येथील अनिकेत स्पोर्ट्स क्लब या संघाची आक्रमक रायडर,अष्टपैलू, गुणवान खेळाडू सिद्धी राजेंद्र चाळके हिची निवड झाल्याबद्दल खेड तालुका कब्बड्डी असोसिएशन च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
--------
कळंबणीत ३० पासून पारायण सोहळा
खेड ः तालुक्यातील कळंबणीत बुद्रुक पिंपळवाडी येथे ३० मार्च ते २ एप्रिलपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. ३० ला भागोजी पाटणे यांचे प्रवचन, गणेश शिगवण यांचा हरिपाठ व कीर्तन, वाळंजवाडी भजनी मंडळाचा हरिजागर, ३१ रोजी येसरे महाराजांचे प्रवचन, अविनाश येसरे यांचे कीर्तन, हंबीरवाडी येथील सद्गुरू भजन मंडळाचा हरिजागर, १ एप्रिल रोजी प्रसाद दळवी यांचे प्रवचन, आंबेडे महाराजांचा हरिपाठ, कैलास पैठणकरांचे कीर्तन व पिंपळवाडी महिला मंडळाचा हरिजागर, २ रोजी सकाळी ९ वाजता ठाण्याच्या यशवंत पाटील यांचे काल्याचे कीर्तन होईल.
--------

गंजलेल्या विद्युत खांबाचा तीन घरांना धोका
खेड ः तालुक्यातील संगलट- कुणबीवाडी येथे गंजलेल्या विद्युत खांबामुळे ३ घरांना धोका निर्माण झाला आहे. या बाबत महावितरणकडे सातत्याने तक्रारी करूनही दादच दिली जात नसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दुर्घटना घडल्यानंतरच महावितरण जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे महावितरण वीजबिल थकल्यानंतर वीज जोडणी तोडण्याची तातडीने कारवाई करते. दुसरीकडे ग्रामस्थांच्या जीवितास गंजलेल्या खांबामुळे धोका निर्माण झालेला असतानाही त्याकडे कानाडोळाच केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संगलट-कुणबीवाडी येथील ३ घरांना गंजलेल्या विद्युत खांबामुळे कोणत्याही क्षणी धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ३ कुटुंबीयांसह अन्य ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com