दाभोळ-पुसाळकर केवळ निवडणुकीपुरतेच आले होते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-पुसाळकर केवळ निवडणुकीपुरतेच आले होते
दाभोळ-पुसाळकर केवळ निवडणुकीपुरतेच आले होते

दाभोळ-पुसाळकर केवळ निवडणुकीपुरतेच आले होते

sakal_logo
By

दापोली नगरपंचायत--लोगो


पुसाळकर केवळ निवडणुकीपुरतेच आले होते

प्रसाद रेळेकर ; शहरवासीय महाविकास आघाडीला कंटाळे
दाभोळ, ता. २१ : ज्या पक्षात सर्वच माजी व भावी आहेत, त्या पक्षात माजी उपनगराध्यक्षांनी प्रवेश केला म्हणून आमच्यावर कोणताही फरक पडणार नाही. आमच्याकडे सर्व विद्यमान आहेत व ते सर्व विद्यमानच राहतील. प्रशांत पुसाळकर हे आमच्याकडे केवळ निवडणुकीपुरते आले होते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांनी दिली आहे.
दापोलीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी ठाकरे गटात केलेल्या प्रवेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शहरप्रमुख रेळेकर म्हणाले, ज्या पक्षाचे प्रमुख हे माजी मुख्यमंत्री आहेत. पक्षामध्ये दापोली मतदारसंघात माजी आमदार कार्यरत आहेत. सर्वच पदाधिकारी हे शिवसेनेचे माजी पदाधिकारी असल्याने या पक्षात माजी उपनगराध्यक्ष यांनी प्रवेश केला म्हणून आमच्यावर कोणताही फरक पडला नाही. मुळचे ते काँग्रेसचे होते. त्यामुळे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे कोणाताही फरक पडत नाही. दापोली नगरपंचायतीमध्ये गेले एक वर्ष विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात येथील सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे शहरवासीयांमध्ये नाराजीचे वातावरण असून नगरसेवकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चलबिचल सुरू आहे. दापोली शहरामध्ये आमदार म्हणून कार्यरत असताना विद्यमान आमदार योगेश कदम यांनी रस्त्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला होता. त्याचप्रमाणे दापोलीची ग्रामदेवता काळकाई देवस्थानाच्या विकासासाठी ३ कोटी ६६ लाख ४२ हजार रुपयांचा निधी आणला आहे. त्यामुळे शहरवासीयांची आमच्याकडून फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा असून शहरवासीय महाविकास आघाडीच्या सत्तेला कंटाळले असल्याचा दावाही त्यांनी केला.