अतिवृष्‍टीबाधित शेतकऱ्यांना 
दोन वर्षांपासून भरपाई नाही

अतिवृष्‍टीबाधित शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून भरपाई नाही

अतिवृष्‍टीबाधित शेतकऱ्यांना
दोन वर्षांपासून भरपाई नाही

१९ हजार ३१०.०४ हेक्टर भातशेती बाधित


कणकवली, ता. २१ : जिल्ह्यात ऑक्‍टोबर-नोव्हेंबर २०२० या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्‍बल १९ हजार ३१० हेक्‍टरमधील भातशेतीचे पूर्णतः नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तत्‍कालीन मंत्र्यांनी अनेकवेळा जिल्‍हा दौरेहे केले; मात्र प्रचंड नुकसान होऊनही भात उत्‍पादक शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही.
भात कापणीला आले असताना दोन वर्षांपूर्वी तब्‍बल पंधरा दिवस पाऊस कोसळला. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठी हानी झाली. भातशेतीला कोंब आल्‍याने अनेक शेतकऱ्यांचे वर्षाचे भात उत्पन्नही बुडाले. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्‍या या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातशेतीचे पंचनामे करण्यात आले. त्‍याचा अहवाल राज्‍य शासनाकडेही पाठविण्यात आला. जिल्ह्यातील ५४ हजार ४७४ शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना २० कोटी ६७ लाख ३९ हजार रुपये एवढी नुकसान भरपाई अपेक्षित होती. त्‍यासाठी शेतकऱ्यांनी शासन दरबारी फेऱ्या मारल्‍या. जिल्‍हा पातळीवर तसेच मंत्रालय पातळीवरही पत्रव्यवहार केला; परंतु अद्यापही बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्‍या अतिवृष्‍टीमध्ये कणकवली तालुक्‍यातील शेतकऱ्यांना १ कोटी ४४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार होती. तसे पंचनामेही केले होते; परंतु प्रत्‍यक्षात भरपाई मिळाली नाही. प्रचंड नुकसान होऊनही नुकसान भरपाई मिळाली नसल्‍याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.
---------------
कोट
दोन वर्षांपूर्वीच्या अतिवृष्‍टीत भातशेती पंधरा दिवस पाण्याखाली राहिली. तयार झालेल्‍या भाताला कोंब आले. त्‍यामुळे भात पिकातून उत्पन्नच मिळाले नाही. शासनाने आश्‍वासन देऊनही एक रुपयाची भरपाई मिळालेली नाही.
- विजय वालावलकर, शेतकरी, साकेडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com