विविध वेशभूषेसह अप्रतिम कला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध वेशभूषेसह अप्रतिम कला
विविध वेशभूषेसह अप्रतिम कला

विविध वेशभूषेसह अप्रतिम कला

sakal_logo
By

90521
कणकवली : शहरातील झेंडा चौकातील राधाकृष्ण नृत्‍य रोंबाट स्पर्धेत नृत्‍याविष्कार सादर करताना कलाकार. दुसऱ्या छायाचित्रात देखावे सादर करताना कलाकार. (छायाचित्र : अनिकेत उचले)


विविध वेशभूषांसह अप्रतिम कला

कणकवलीतील राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धा; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली, ता.२१ : शहरातील बाजारपेठ झेंडा चौकातील मांड उत्‍सवातील राधाकृष्ण नृत्‍य रोंबाट स्पर्धेत विविध संघांचे कलाविष्कार लक्षवेधी ठरले. जिल्ह्यातील प्रमुख संघांतील कलाकारांनी आकर्षक वेशभूषेसह नृत्‍याचं अप्रतिम सादरीकरण केले. त्‍याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्‍या रसिकांनीही दाद दिली.
शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळाच्यावतीने राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा झाली. यात जिल्ह्यातील विविध संघांनी कलाविष्कार सादर केले. हार्मोनियम, तबला, पखवादचा नाद आणि गवळण आणि भारूड गीतांच्या ठेक्यावर नाचत रात्री उशिरापर्यंत कलाकारांचे आविष्कार रंगले होते. यात ट्रिकसीनयुक्त देखाव्यांमुळे आणखी रंगत आली.
कार्यक्रमाचे उद्‌घाटन युवा नेते संदेश पारकर यांनी केले. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पारकर राजन पारकर, मंदार सापळे,राजू मानकर, राजेश सापळे,नीलेश धडाम, काशिनाथ कसालकर, शशिकांत कसालकर, उदय मुंज, बाळा सापळे, हरिष उचले, तेजस राणे, प्रसन्ना देसाई, चेतन अंधारी, दिनेश नार्वेकर, हर्षल अंधारी, प्रद्युम मुंज, बाळा तिरोडकर, आनंद पोरे, रुपेश खाडये मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बाळू वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.
--
रोंबाट स्पर्धेतील विजेत्‍यांना पारितोषिक
राधाकृष्णनृत्य रोंबाट स्पर्धेत गावडोबा माडाचीवाडी या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गावडोबा कलेश्‍वर ब्राह्मण साईचीवाडी-राईवाडी या संघाने
द्वितीय तर गांगेश्‍वर मंडळ माडाचीवाडी या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. गणेश कृपा मित्रमंडळ तेंडोली-तळेवाडी व आईभवानी उमरमळा
वालावल या संघांनी उत्तेजनार्थ पारितोषक प्राप्त केले. सर्वांना पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. हरिभाऊ भिसे व ज्येष्ठ अभिनेते श्याम नाडकर्णी यांनी केले.