माडखोल-कारीवडे रस्ताकामास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माडखोल-कारीवडे रस्ताकामास प्रारंभ
माडखोल-कारीवडे रस्ताकामास प्रारंभ

माडखोल-कारीवडे रस्ताकामास प्रारंभ

sakal_logo
By

90522
माडखोल ः येथे रस्ताकामास सुरुवात करण्यात आली.

माडखोल-कारीवडे रस्ताकामास प्रारंभ
सावंतवाडी ः माडखोल-फुगीवाडी बाजार ते ठाकूरवाडी भगवती प्रसाद मंगल कार्यालय कारीवडे जाणारा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत रस्ताकामास सुरुवात केली. त्यामुळे माडखोल ग्रामस्थांसह लाड यांनी समाधान व्यक्त करत बांधकामचे आभार मानले. माडखोल फुगीवाडी बाजार ते ठाकूरवाडी भगवती प्रसाद मंगल कार्यालय कारीवडेपर्यंत जाणारा रस्ता वाहतुकीस सुस्थितीत नव्हता. दोन्ही बाजूने संरक्षण गटार पावसामध्ये वाहून गेला होता. रस्त्याच्या मध्यभागी खड्ड्यांचे साम्राज्य होते. गेली दहा वर्षे याबाबतचा पाठपुरावा माडखोल ग्रामस्थ आणि लाड यांच्यावतीने सुरू होता. रस्ता पूर्ण न झाल्यास १ मेपासून येथील बांधकामच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी संबंधित विभागाला दिला होता; मात्र त्यापूर्वीच कामाला सुरुवात केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.