आचरा रामेश्वर मंदिर रस्तेकामास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचरा रामेश्वर मंदिर रस्तेकामास प्रारंभ
आचरा रामेश्वर मंदिर रस्तेकामास प्रारंभ

आचरा रामेश्वर मंदिर रस्तेकामास प्रारंभ

sakal_logo
By

90523
आचरा ः रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ताकामाचा प्रारंभ देवस्थान अध्यक्ष मिलिंद मिराशी, सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते झाला.

आचरा रामेश्वर मंदिर रस्तेकामास प्रारंभ
आचरा : आचरा देवगड मुख्य रस्ता ते श्री देव रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आचरेचे अध्यक्ष मिलिंद मिराशी आणि आचरे गावच्या सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्ताकामासाठी आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून २० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. आचरे गावात प्रसिद्ध संस्थानकालीन श्री देव रामेश्वर मंदिर असून या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. ग्रामपंचायतीच्या नागरी सुविधामधून १२ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य मंगेश टेमकर यांनी दिली. या कामाचा प्रारंभ श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिराशी, सरपंच टेमकर यांच्या हस्ते झाला. यावेळी विनायक परब, एकनाथ परब, दिलीप कोदे, संतोष मिराशी, अभय भोसले, बाबा सावंत, सचिन हडकर, अनुष्का गावकर, समीर लब्दे, नितीन घाडी, श्याम घाडी, दशरथ घाडी, राजन गावकर तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.