
देवरूख-पित्रे महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणास प्रारंभ
फोटो ओळी
-rat21p21.jpg-KOP23L90525
देवरूख ः प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात निधी सावंत, ॲड. प्रभूदेसाई, उपप्राचार्य डॉ. पाटील आणि उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.
पित्रे महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षण
देवरूख, ता. २१ ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महिला विकास कक्ष व आजीवन अध्ययन कक्ष या विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनशिक्षण संस्थानच्या साह्याने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना ज्युट व हस्तकला उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. उपक्रमाचे उद्घाटन जनशिक्षण संस्थेच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी निधी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमात निधी सावंत यांनी मार्गदर्शन जनशिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. जनशिक्षण संस्था ही योजना भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत लोकांना आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षणांचे आयोजन गावस्तरावर केले जाते. दक्षता, स्वावलंबन आणि सन्मान या त्रिसूत्रीचा अवलंब करून ग्रामीण जनतेच्या उपजीविकेला व पर्यायाने ग्रामीण विकासाला चालना देण्याचे काम या योजनेतून होत आहे. याबरोबरच साक्षरता, पर्यावरण, आरोग्य, महिला प्रबोधन अशा विविध विषयांवरही जनजागृती केली जात आहे.
उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांची दुरुस्ती, कोकणातील विविध फळांवरील प्रक्रिया करणारे प्रशिक्षण या संस्थेकडून दिले जावे अशी इच्छा व्यक्त केली. कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी अशा प्रकारच्या प्रशिक्षणांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन विद्यार्थिनींनी कौशल्य पारंगत होऊन व्यावसायिक दृष्टीने स्वावलंबी व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. या प्रशिक्षणांतर्गत वीस विद्यार्थिनी जूट व हस्तकला उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण घेत आहेत.