चौकेत स्मार्ट लेडी स्पर्धेत आर्या गावकर विजेत्या

चौकेत स्मार्ट लेडी स्पर्धेत
आर्या गावकर विजेत्या

90529
चौके ः येथील स्पर्धेत आर्या गावकर स्मार्ट लेडीच्या मानकरी ठरल्या.

चौकेत स्मार्ट लेडी स्पर्धेत
आर्या गावकर विजेत्या
मालवण, ता. २१ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण सभासद चौके येथील साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या वैभवी चौकेकर यांच्यावतीने चौके येथे आयोजित स्मार्ट लेडी स्पर्धेत हडी येथील आर्या गावकर यांनी विजेतेपद पटकावून स्मार्ट लेडीचा बहुमान मिळविला. त्यांना युवती सेनेच्या मालवण कुडाळच्या समन्वयक शिल्पा खोत यांच्या हस्ते पैठणी व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
चौके येथील मंदार गावडे अप्सरा हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. तारकर्लीच्या माजी सरपंच व जिल्हा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष स्नेहा केरकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी केरकर यांनी मार्गदर्शन केले. आचरा येथील ‘कोमसाप’च्या सदस्य मनाली फाटक यांनी महिलांचे गुण दर्शविणारे गीतगायन केले. स्पर्धेत द्वितीय क्रमांक नेहा चौकेकर यांनी पटकावला. त्यांना अन्नपूर्णा देवीची मूर्ती देऊन निकिता गावडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर तृतीय क्रमांक विजेत्या राधिका पार्टे यांना वृंदावन तुळस देऊन मनाली फाटक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पूजा म्हापणकर, प्रतिभा चौकेकर, रोहिणी चौकेकर यांना वैभवी चौकेकर व प्रणाली गावडे पुरस्कृत उत्तेजनार्थ बक्षिसे शिल्पा खोत यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी शांती तोंडवळकर, चव्हाण, गार्गी चौकेकर, सानिका चौकेकर, सुचिता चौकेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com