त्रिंबकमध्ये रंगल्या ‘किसान गप्पागोष्टी’

त्रिंबकमध्ये रंगल्या ‘किसान गप्पागोष्टी’

90530
त्रिंबक ः पाककला स्पर्धेचे उद्‍घाटन तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.


त्रिंबकमध्ये रंगल्या ‘किसान गप्पागोष्टी’

शेतकऱ्यांना धडे; पाककला स्पर्धाही उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ : तालुका कृषी विभाग, तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिंबक येथे ‘किसान गप्पागोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आयोजित पाककला स्पर्धेत स्नेहलता मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे, एस. जी. परब, डी. के. सावंत, सरंबळकर, एस. डी. कदम, ए. डी. कुरकुटे, अमृता भोगले, विद्या कुबल, धामापूरकर, स्नेहल जिकमडे, नेहा वेंगुर्लेकर, सपना तेली, सुरेंद्र संकपाळ, संतोष घाडीगावकर, अर्चित लेले, ठाणेश्वर महिला ग्रामसंघ व महिला उपस्थित होत्या. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. आचरा मंडल कृषी अधिकारी अतुल कांबळे यांनी प्रास्तावित केले. किसान गप्पागोष्टी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक फोंडाघाट भात संशोधन केंद्राचे डॉ. शेटये यांनी आंबा पीक मोहोर संरक्षण व कीडा नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगितले. तालुका कृषी अधिकारी गोसावी यांनी संतुलित आहार तसेच कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. पाककला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रचना देसाई, डी. एम. तोरणे यांनी मार्गदर्शन केले. पाककला स्पर्धेत द्वितीय सायली त्रिंबककर, तृतीय क्रमांक सिद्धी गोसावी यांनी पटकावला. मुग्धा राणे, अस्मिता सुतार, प्राची त्रिंबककर, वर्षा जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. ३५ महिलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com