बिस्कीट प्रशिक्षणास मालवणात प्रतिसाद

बिस्कीट प्रशिक्षणास मालवणात प्रतिसाद

90533
भाजपतर्फे आयोजित कुकीज, मॉकटेल बनविणे प्रशिक्षण कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बिस्कीट प्रशिक्षणास
मालवणात प्रतिसाद
मालवण, ता. २१ : भाजपचे युवा नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने येथे घेण्यात आलेल्या एक दिवसीय कुकीज बिस्कीट व मॉकटेल सरबत बनविण्याच्या प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक उत्पादन होणाऱ्या धान्यापासून बिस्किटे बनवण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून जव, नाचणीपासून बिस्कीट बनवण्याचे आणि विविध मॉकटेल बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कोकम, जांभूळ, करवंदे, काजू यांच्यापासून सरबते बनविण्याबाबत माहिती दिली. शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी मार्गदर्शन केले. विविध उद्योग उभे राहण्यासाठी केंद्रीयमंत्री राणे करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी बँकेद्वारे महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांतून आर्थिक सहाय्य करण्यात येत असून त्याचा फायदा घेत महिलांनी व्यवसाय करावा, असे आवाहन केले. गणेश कुशे यांनी प्रशिक्षण घेऊन न थांबता व्यवसाय करणे आवश्यक आहे. महिलांनी व्यवसाय करून आर्थिक सक्षम व्हावे, असे सांगितले. पूजा करलकर, पूजा सरकारे, पूजा वेरलकर, घुमडे सरपंच स्नेहल बिरमोळे, कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर, महिमा मयेकर, शर्वरी पाटकर, महानंदा खानोलकर, वैष्णवी मोडकर, दिव्या कोचरेकर, भाई मांजरेकर, ललित चव्हाण, सुनील बागवे, नरेद्र जामसांडेकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com