रत्नागिरी-संक्षिप्त

रत्नागिरी-संक्षिप्त

फोटो ओळी
-rat२१p१६.jpg- OP२३L९०४९०
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सहकार वार्षिक अंकाचा राजा राजवाडे पुरस्कार मनोहर पारकर यांच्या हस्ते स्वीकारताना डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, डॉ. शाहू मधाळे व डॉ. तुळशीदास रोकडे.


गोगटेच्या सहकार अंकाला राजा राजवाडे पुरस्कार
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचा वार्षिक अंक सहकार राजा राजवाडे पुरस्काराने सन्मानित झाला. महाविद्यालयीन वार्षिकांक २०२१-२२ च्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालयामार्फत (स्वायत्त) हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सह निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाविद्यालयातर्फे या गौरव समारंभास प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, सहकार अंकाचे तत्कालीन संपादक डॉ. शाहू मधाळे, संपादक डॉ. तुळशीदास रोकडे उपस्थित होते. याप्रसंगी आठल्ये-सप्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार, उपप्राचार्य सरदार पाटील या वेळी उपस्थित होते. महाविद्यालयाचा वार्षिक अंक हा महाविद्यालयाचा दस्तऐवज असतो. महाविद्यालयीन विद्यार्थी नव लेखकांसाठी हे हक्काचे व्यासपीठ आणि सृजनात्मक संधी यातून उपलब्ध होते. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी सहकार अंक डिजिटल व मुद्रित अशा दोन्ही माध्यमातून उपलब्ध असून हा अंक विद्यार्थांच्या सकारात्मक शक्तीसाठी अभिव्यक्तीचे योग्य व्यासपीठ आहे, असे सांगून सहकारी प्राध्यापक, संपादक मंडळ व विद्यार्थी नवलेखक यांचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.

आसूदला आज, उद्या स्वामी समर्थ प्रकट दिन
दाभोळ ः दापोली तालुक्यातील आसूद येथील स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रकटदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २२ आणि २३ मार्चला होणार आहे. बुधवारी (ता. २२) श्रींची पुजा वेदमूर्ती अनिरुद्ध पेंडसे व सहकारी यांचे श्रीगुरुचरित्र पारायण, श्रींची आरती व मंत्रपुष्प, २३ ला स्वामी समर्थ जयंती, वेदमूर्ती रामेश्वर परांजपे व सहकारी श्रीच्या पादुकांची पूजा व लघुरूद्र, होमहवन, श्रींची आरती व मंत्रपुष्प, महाप्रसाद, हळदीकुंकू, संगीत सेवा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक वैभव जोशी यांनी केले आहे.


दापोलीत ठाकरे शिवसेनेची २८ ला स्वागत सभा
दाभोळ ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खेड येथील गोळीबार मैदानात झालेल्या सभेत माजी आमदार संजय कदम कुणबी समाजातील पदाधिकारी रमेश पांगत, रवि घडवले, सूर्यकांत म्हसकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विश्वास कदम यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना दापोली तालुक्याच्या वतीने मंगळवारी (ता. २८) सकाळी १०.३० वाजता दापोली शहरातील पद्मश्रद्धा हॉल नर्सरी रोड येथे पक्षप्रवेश केलेल्या सर्व सहकार्यांसाठी स्वागतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com