डॉ. आंबेडकर जयंती समिती अध्यक्षपदी शंकर जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आंबेडकर जयंती समिती 
अध्यक्षपदी शंकर जाधव
डॉ. आंबेडकर जयंती समिती अध्यक्षपदी शंकर जाधव

डॉ. आंबेडकर जयंती समिती अध्यक्षपदी शंकर जाधव

sakal_logo
By

डॉ. आंबेडकर जयंती समिती
अध्यक्षपदी शंकर जाधव
दोडामार्ग, ता. २१ ः यावर्षी तालुक्यातील पाच संघटनांच्या संयुक्त विद्यामाने विश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव थाटात साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाची नियोजन बैठक शंकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्नेह रेसिडेन्सी येथे झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव तालुक्यातील आरपीआय आठवले गट, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि युवा परिवर्तन संघर्ष संस्था व तालुका शाखा दोडामार्गच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी केली जाणार आहे. बैठकीदरम्यान जयंती कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून मागासवर्गीय समाजातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, बौद्ध श्रामणेर, समता सैनिक दल यांचा सत्कार तसेच दहावी, बारावी, पदवीधर, पदवीत्तर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बचत गटांमधील महिलांचा सन्मान केला जाणार आहे. तालुक्यातील संघटना एकत्र येत जयंती उत्सव दिमाखात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तालुक्यातील लोक सहभागी होणार असल्याने तसे नियोजन करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी आरपीआय (आठवले ) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, माजी जिल्हा समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, आरपीआय (आठवले ) जिल्हा सचिव प्रकाश कांबळे, बौद्ध हितवर्धक महासंघ तालुका शाखा दोडामार्ग अध्यक्ष शंकर जाधव आदी उपस्थित होते.