
इन्स्टिटयुटच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण मिळावे
90542
तळेरे ः आमदार नीतेश राणे यांचा सत्कार करताना डॉ. अभिनंदन मालंडकर. शेजारी इतर.
इन्स्टिटयुटच्या माध्यमातून
दर्जेदार प्रशिक्षण मिळावे
नीतेश राणे; तळेरेत शपथविधी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २१ : सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्याही बाबतीत कमी पडता कामा नये. जे अन्य राज्यांत, देशात चांगले होत असेल, ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायचे आहे. दर्जेदार प्रशिक्षण मालंडकरसारख्या इन्स्टिटयुटच्या माध्यमातून उपलब्ध झाले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले. येथील अबोली कुलदीप पेडणेकर नर्सिंग स्कूल आणि ज्ञानवर्धिनी नर्सिंग इन्स्टिट्युटच्या शपथविधी कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कणकवली सभापती मनोज रावराणे, माजी सभापती संतोष कानडे, ज्ञानवर्धिनी ट्रस्टचे चेअरमन डॉ. अभिनंदन मालंडकर, सहसचिव दिलीप तळेकर, खजिनदार डॉ. निशा मालंडकर, चिटणीस शर्मिला सावंत, कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुचिता तळेकर, दर्शना धुरे, ज्ञानवर्धिनी नर्सिंग इन्स्टिट्युटच्या प्राध्यापिका हर्षदा आरोलकर व कोमल मेहतर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार राणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्कूलमधील आरएएनएम व जीएनएमच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना सुचिता तळेकर हिने वैद्यकीय व्यवसायाची शपथ दिली. दिलीप तळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. शपथविधी कार्यक्रमानंतर मुलांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नीलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभिनंदन मालंडकर यांनी प्रास्ताविक केले.