उल्का विश्वासरावनी आपले अज्ञान प्रगट करू नये

उल्का विश्वासरावनी आपले अज्ञान प्रगट करू नये

बातमी क्र. २५ ( पान ५ साठी)

उल्का विश्वासरावांनी आपले अज्ञान प्रगट करू नये

लांजा, ता. २१ ः आमदार राजन साळवी यांनी तीन टर्ममध्ये किती विकासनिधी दिला व कोणकोणत्या प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली, याची परिपूर्ण माहिती घेतली असती तर भाजपा उद्योग आघाडीच्या कोकण विभाग महिला समिती सहप्रमुख उल्का विश्वासराव यांना आपले अज्ञान प्रगट करण्याची वेळ आली नसती, असे मत माजी उपसभापती तथा युवासेना तालुका युवती संघटक दीपाली दळवी-साळवी यांनी व्यक्त केले.
अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर लांजा तालुक्यामध्ये मंजूर झालेल्या विकास कामांबाबत पत्रकार परिषद घेत भाजपा उद्योग आघाडीच्या कोकण विभाग महिला समिती सहप्रमुख उल्का विश्वासराव यांनी आमदार राजन साळवी यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये अशी टीका केली होती. यावर दीपाली दळवी-साळवी म्हणाल्या, उल्का विश्वासराव यांनी प्रथम आमदार राजन साळवी यांनी तीन टर्ममध्ये मतदार संघामध्ये किती विकास निधी दिला व मुलभूत स्वरुपात सहकार्य वा मदत करीत आहेत याची माहिती घ्यावी व नंतरच पक्षाकडून मिळालेल्या पदाप्रती आपण काहीतरी करतोय या केविलवाण्या अविभार्वात व्यक्तव्ये करावीत. ज्याचे सरकार त्याचे अर्थसंकल्प अशी अज्ञान समजूत ठेवण्यापेक्षा संबंधित विभागाला केलेली वारंवार मागणी व दिलेले पत्र व पत्राच्या अनुषंगाने संबंधित विभागाने सादर केलेला प्रस्ताव यांची शासकीय माहिती घ्यावी मग मनोरंजात्मक टीका करावी असे सांगितले.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com