दापोलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित
दापोलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित

दापोलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित

sakal_logo
By

दापोलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित
दाभोळ, ता. २१ : दापोली नगरपंचायतीच्या हद्दीत झालेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत चौकशी करण्यासाठी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यानी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले आहे. दापोली नगरपंचायत हद्दीतील स.नं.४/२,४/४ पैकी ५७५,५७६ या इमारतीस सि.स.नं.१३४६/२,१३४७/७,१७३ ३क,१३४६-३१३४-४,१३४६-५,१३४६-६,१७३३-१ या क्षेत्रामध्ये अस्तित्वात रस्ता नसताना नगरसेवक खालीद रखांगे यांनी कायदेशीररित्या इमारत बांधकाम केल्याबाबत तसेच सदर रेखांकनास शासनाने स्थगिती देवूनदेखील अद्याप कामे चालू असल्याचा आरोप करत दापोली शिवसेनेने मोर्चा व उपोषणाचा इशारा दिला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रत्नागिरी येथील नगर रचना सहाय्यक संचालकांना नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहआयुक्त यांनी विनंती केलेली आहे. या सर्व दस्तावेजांची तपासणी करण्यात काही कालावधी लागणार असल्याने उपोषण मागे घ्यावे असे पत्र मुख्यधिकारी यांनी शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रसाद रेळेकर यांना दिल्याने त्यांनी तूर्त उपोषण स्थगित केले असल्याची माहिती दिली आहे.