नाचनकर यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाचनकर यांना पुरस्कार
नाचनकर यांना पुरस्कार

नाचनकर यांना पुरस्कार

sakal_logo
By

(पान ५ साठी, संक्षिप्त)

- ratchl२११.jpg-
९०५४९
चिपळूण ः शिक्षक योगेश नाचणकर यांचा सन्मान करताना नायब तहसीलदार श्री. घोरपडे.
--
नाचणकर यांना इंटरनॅशनल प्राईम अवॉर्ड पुरस्कार

चिपळूण ः खेर्डी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील मराठी विषय शिक्षक योगेश नाचणकर यांना इंटरनॅशनल प्राईम अवॉर्ड पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील नायब तहसीलदार श्री. घोरपडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. नाचणकर यांना सारनाथ एज्युकेशन ॲण्ड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या संस्थेमार्फत इंटरनॅशनल प्राईम अवॉर्ड २०२२ ने सन्मानित करण्यात आले. नाशिकच्या सांस्कृतिक भूमीत इंदिरानगर येथील आदित्य हॉलमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. शैक्षणिक, सामाजिक, डिजिटल शिक्षण या सर्व बाबींची दखल घेऊन यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापक अमर भाट, पर्यवेक्षक पांडुरंग काळूगडे, पर्यवेक्षिका आसावरी राजेशिर्के, कलाशिक्षक टी. एस. पाटील आदी उपस्थित होते.
-

ब्राह्मण सहाय्यक संघात सार्वजनिक मुंजी उपक्रम

चिपळूण, ता. २१ ः यावर्षी १० मे रोजी येथील ब्राह्मण सहाय्यक संघात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य समाजातील मुलांच्या सार्वजनिक मुंजी केल्या जाणार आहेत. मुंजीच्या सर्व धार्मिक विधींचा खर्च संघातर्फे केला जाणार आहे. मुंज मुलगा, त्याचे आई-वडील आणि सात नातेवाईक यांचा भोजनाचा खर्च संघातर्फे केला जाईल. अधिक नातेवाईक आल्यास त्यांच्या भोजनाचा खर्च मुलांच्या पालकांना करावा लागेल. सोवळ्याच्या लंगोट्या किंवा चड्डी, भिक्षावळीच्या वस्तू, पालकांनी आणावयाच्या आहेत. ज्या पालकांना आपल्या मुलांच्या मुंजी सार्वजनिक मुंजीत करायच्या असतील त्यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाच्या कार्यालयात सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत येऊन प्रत्यक्ष संचालकांची भेट घेऊन नाव नोंदणी करावी. हा उपक्रम केवळ चिपळूण आणि परिसरातील गावांसाठी असणार आहे.
-
फोटो ओळी
- ratchl२१२.jpg-
९०५५१
चिपळूण ः वैश्‍य समाज महिला मंडळातर्फे आयोजित आरोग्य शिबिराला उपस्थित महिला.
-
वैश्‍य समाज महिला मंडळातर्फे आरोग्य शिबिर

चिपळूण ः चिपळूण वैश्‍य समाज महिला मंडळ व अपरांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील वैश्‍य भवन येथील राधाताई लाड सभागृहात शिबिर झाले. आरोग्य शिबिराला लायन्स क्लब चिपळूण व नगर पालिका आरोग्य विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. अब्बास जबले यांनी मार्गदर्शन केले. डॉ. भक्ती पालांडे व डॉ. पूजा यादव यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली. हिमोग्लोबीन व थायरॉईडची तपासणी खंदारे, सुतार व आशा स्वयंसेविकांनी केली. कार्यक्रमाचे नियोजन वैश्‍य समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा गौतमी गांधी, उपाध्यक्षा गीता चिंगळे, रूही खेडेकर, दिव्या रेडीज, राधिका पाथरे, प्रीतम देवळेकर, छाया खातू, रसिका देवळेकर, सुषमा देवळेकर, विभा गांधी, उमा जागुष्टे, रिया खेडेकर, महाकाळ आदींनी केले होते.
-

चिपळुणात ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धा

चिपळूण ः चिपळूण एकता विकास मंच, निमा (डॉक्टर संघटना) व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेपूर्वी माधव बागच्या वतीने व एकता विकास मंचच्या पुढाकाराने स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची स्ट्रेस टेस्ट (मोफत) घेतली जाणार आहे. यामध्ये पात्र होणाऱ्यांनाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. यासाठी एकता विकास मंचच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. इतर ज्येष्ठ नागरिकांना वैयक्तिक जबाबदारीवर चिअर अपसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धा पुरुषामध्ये ५० ते ६० वर्षे एक गट तर ६० ते ७० वर्ष दुसरा गट तर महिलांसाठी ५० वर्षापासून पुढे अशा गटामध्ये स्पर्धा होतील. प्रत्येक गटामध्ये ५ विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धा ७ एप्रिलला सकाळी ७ वाजता चिंचनाका ते बांदल हायस्कूल या दरम्यान घेतली जाईल. स्पर्धेकांना मधवबागकडून टीशर्ट व टोपी दिली जाईल.
-
गोवळकोटला १ एप्रिलपासून क्रिकेट स्पर्धा

चिपळूण ः सम्राट अशोका सामाजिक क्रीडा मंडळातर्फे १ ते ३ एप्रिलदरम्यान गोवळकोट धक्का मैदान येथे बौद्ध समाज मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी राहुल कदम, संकेत कदम, राजेश कदम यांच्याशी संपर्क साधावा.