खेमसावंत भोसलेंचा वाढदिवस उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेमसावंत भोसलेंचा वाढदिवस उत्साहात
खेमसावंत भोसलेंचा वाढदिवस उत्साहात

खेमसावंत भोसलेंचा वाढदिवस उत्साहात

sakal_logo
By

90536
सावंतवाडी ः खेमसावंत भोसले यांचा वाढदिवस साजरा करताना शुभदादेवी भोसले, लखमराजे आदी.

खेमसावंत भोसलेंचा वाढदिवस उत्साहात
सावंतवाडी ः येथील संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पंचम खेमराज महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच त्यांच्या आप्तस्वकीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखम सावंत-भोसले, युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले, ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, प्राचार्य दिलीप भारमल, डी. टी. देसाई, जयप्रकाश सावंत, सुधीर बुवा, सचिन देशमुख, भुजंगराव हिरामणी, नीलम धुरी, प्रगती अमृते, देविदास बोर्डे, महेंद्र ठाकूर, गणेश मर्गज, अनुजा साळगावकर, अश्विनी लेले, प्रा. राठोड, आर. बी. शिंत्रे, सोमेश्वर सावंत आदी उपस्थित होते.
--
90548
अध्यक्षपदी देवधर, सचिवपदी कदम
देवगड ः किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर, तर सचिवपदी बाळा कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या समितीची नूतन कार्यकारिणी बैठकीत नेमण्यात आली. उद्या (ता. २२) गुढीपाडव्यानिमित्त प्रेरणोत्सव समितीच्यावतीने पर्यटकांच्या सोयीसाठी ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’ तसेच पर्यटक विसावा केंद्राचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. प्रेरणोत्सव समितीची नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. निवडलेली समिती अशी ः अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम, उपाध्यक्ष शरद डोंगरे, सहसचिव यशपाल जैतापकर, खजिनदार रविकांत राणे, सहखजिनदार प्रवीण तरवडकर, सदस्य संजय सावंत, गणेश मिठबावकर, प्रदीप साखरकर, प्रदीप मिठबावकर, इम्रान मुकादम. याचबरोबर समिती अधिक सक्षम करण्यासाठी किल्ले संवर्धन समिती, युवा समिती, महिला समिती आदी समित्या गठीत करण्यात येणार आहेत. दरम्यान, कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष व सल्लागार राजीव परुळेकर, नूतन अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी केले आहे.