डीएड्, बीएड्धारकांचे गुरुवारी धरणे आंदोलन

डीएड्, बीएड्धारकांचे गुरुवारी धरणे आंदोलन

डीएड्, बीएड्धारकांचे गुरुवारी धरणे आंदोलन

शिक्षक भरती विभागस्तरावर करा ः जिल्हा बदलीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

रत्नागिरी, ता. २१ ः कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रूजू व्हायचे आणि काही वर्षात आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे. या प्रकारामुळे कोकणातील शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. आगामी शिक्षक भरती विभागस्तरावर करावी आणि स्थानिकांना त्यात आरक्षण द्यावे, यासाठी कोकण डीएड्, बीएड्धारक संघटना रत्नागिरीत गुरुवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
डीएड्, बीएड्धारक संघटनेचे अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर, सचिव संदेश रावणंग, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे रमजान गोलंदाज, विजय आखाडे, प्रभाकर धोपट, कल्पेश घवाळी, भालचंद्र दुर्गवले, राजेश इंगळे, ओमकार मयेकर यांनी माहिती देताना सांगितले की, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती विभागस्तरावर करण्याचे आश्वासन विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले आहे. या निर्णयाला आम्हा कोकणातील डीएड्, बीएड्धारकांचा पाठिंबा आहे. या शिक्षक भरतीसाठी टीएआयटी परीक्षा झाली असून भरती प्रक्रिया काही दिवसांनी सुरू होणार आहे. तत्पूर्वी विभागीय शिक्षक भरतीचा शासन निर्णय निर्गमित करून विभागीय आरक्षणाची टक्केवारी जाहीर करावी, अशी आमची मुख्य मागणी आहे. शिक्षणमंत्र्यांच्या विभागीय भरती प्रकियेच्या निर्णयामुळे कोकणातील शाळांना स्थानिक शिक्षक मिळतील. तसेच जिल्हा बदलीच्या समस्येवर तोडगा निघून येथील विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल. विभागीय शिक्षक भरतीचा निर्णय योग्यच असून शिक्षणमंत्र्यांच्या समर्थनासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत.
शिक्षकांच्या नोकऱ्यांचे खासगीकरण थांबवावे, विभागीय स्तरावर शिक्षक भरती करण्याचा शासन निर्णय निर्गमित करून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. विभागीय आरक्षणाबाबत टक्केवारी जाहीर करावी. त्यात विभागाला ७० टक्के व उर्वरित राज्याला ३० टक्के आरक्षण देण्यात यावे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलेली सुमारे ३० हजार रिक्त पदे एकाच टप्प्यात भरण्यात यावीत आदी मागण्या या संघटनेने केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com