डॉ. धारपवार, डॉ. शेजवळांना 
''आपले बाबा 2022'' पुरस्कार

डॉ. धारपवार, डॉ. शेजवळांना ''आपले बाबा 2022'' पुरस्कार

डॉ. धारपवार, डॉ. शेजवळांना
‘आपले बाबा २०२२’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २१ : पीडित व दलितांच्या वेदना शब्दबद्ध करा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. या कसोटीवर डॉ. धारपवार व डॉ. शेजवळ यांचे लेखन उतरले आहे, असे प्रतिपादन सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधुवैभव साहित्य समूह कणकवलीच्या ‘आपले बाबा २०२२’ पुरस्कार वितरणप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका ऊर्मिला पवार यांनी केले. हा पुरस्कार आंबेडकरी साहित्याला देण्यात येतो. पुरस्कारांचे वितरण काल (ता. २०) महाड चवदार तळे पाणी सत्याग्रहदिनी ऑनलाईन करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या पुस्तकाचे लेखक डॉ. श्रीकांत धारपवार यांनी कोरोना काळात मिळालेल्या फुरसतीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या शंभर वर्षांत बाबासाहेबांच्या प्रेरणेने घडलेल्या घडामोडींचे लिखाण मी करू शकलो, असे सांगितले. तर ‘आंबेडकरी जलसा’ या पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक डॉ. मिलिंद शेजवळ यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालेल्या सकारात्मक बदलाचा उल्लेख केला. दलित साहित्याला राजदरबारात मान मिळत नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाला ज्येष्ठ भाषा अभ्यासक व तज्ज्ञ, साहित्यिक डॉ. रवींद्र शिवदे, नाशिक व सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शुभांगी पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. सतीश पवार यांनी केले. सिंधुवैभव साहित्य समूहाच्या अध्यक्षा स्नेहा राणे सरंगले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com