रत्नागिरी-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम
रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

sakal_logo
By

जाकादेवीत ९१ हजार २५० रुपयांची चोरी
रत्नागिरी, ता. २१ः तालुक्यातील जाकादेवी येथील महिलेच्या घरातील पर्स मधील ९१ हजार २५० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची संशयित वृद्धाने चोरी केली. चोरट्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन्नाथ सीताराम बने (वय ६८, रा. रत्नागिरी) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्षा व्यंकट चव्हाण (वय ५९, रा. पेट्रोल पंपाचे अलीकडे जाकादेवी, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरातून संशयित वृद्धाने सोने व रोख रक्कम असा ९१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी वर्षा चव्हाण यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.