
वेंगुर्लेत रंगपंचमी उत्साहात
90562
वेंगुर्ले : येथील रामेश्वर मंदिरनजीक रंगपंचमी साजरी करताना युवा वर्ग.
वेंगुर्लेत रंगपंचमी उत्साहात
वेंगुर्ले ः होळी पौर्णिमेपासून पंधरा दिवस साजरा होणाऱ्या शिमगोत्सवाच्या आज शेवटच्या दिवशी वेंगुर्ले शहरवासीयांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या धुळवडीच्या पार्श्वभूमीवर आबालवृद्धांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत रंगांची उधळण केली. शिमगोत्सवानिमित्त होळीला नारळ अर्पण करण्यासाठी सर्व वाड्यांतील ग्रामस्थ आपल्या रोंबटांसह मांडावर येऊन वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाले. आज शिमगोत्सवाच्या शेटच्या दिवशी शहरासह उभादांडा, नवाबाग भागातील वाडीत, गल्लोगल्ली तसेच घरोघरी दिवसभर सर्वांनी रंगोत्सव साजरा केला. काही ठिकाणी ढोलताशे तर काही ठिकाणी डीजेच्या तालावर नृत्याचा आनंद लुटला. सायंकाळपर्यंत धुळवडीचा कार्यक्रम सुरू होता.
...............
तळवडेत एप्रिलमध्ये भजन स्पर्धा
सावंतवाडी ः तळवडे येथील भजनप्रेमी व ग्रामस्थांतर्फे प्रकाश परब स्मृती निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा तळवडे बाजारपेठ येथील सिद्धेश्वर मंदिर येथे ८ एप्रिलला आयोजित केली आहे. सायंकाळी सहाला स्पर्धा सुरू होईल. यामध्ये श्री देव इसवटी भजन मंडळ, मातोंड (बुवा सचिन सावंत), श्री देवी भवानी भजन मंडळ, न्हावेली रेवटेवाडी (बुवा अक्षय जाधव), स्वरधारा संगीत भजन मंडळ, डिगस (बुवा गौरेश चव्हाण), स्वामी समर्थ भजन मंडळ, कलंबिस्त (बुवा संतोष धर्णे), रवळनाथ भजन मंडळ, पिंगुळी (बुवा रुपेश यमकर), स्वरधारा भजन मंडळ, तांबोळी (बुवा अमित तांबोळकर), सद्गुरू भजन मंडळ, तुळस वडखोल (बुवा पुरुषोत्तम परब) आदी सहभागी संघ होणार आहेत. स्पर्धेसाठी ५००१ रुपये, ४००१ रुपये, ३००१ रुपये व प्रत्येकी सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र तसेच उत्तेजनार्थ १००१ रुपये आदी बक्षिसे आहेत. अधिक माहितीसाठी दिनेश परब, रोहित परब यांच्याशी संपर्क साधावा.