‘गॅसच्या किमती कमी करा’

‘गॅसच्या किमती कमी करा’

90573
कुडाळ ः गॅस दरवाढीविरोधात येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने आंदोलन केले.


‘गॅसच्या किमती कमी करा’

ठाकरे गटाचे कुडाळात आंदोलन; चुलीवर भाकरी थापून सरकारचा निषेध


कुडाळ, ता. २१ ः केंद्राकडून केलेल्या घरगुती गॅस दरवाढीविरोधात येथे उद्धव ठाकरे शिवसेनेकडून आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जिजामाता चौक येथे दगडी चुलीवर भाकरी बनवून सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र तसेच राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘केंद्र सरकारचा निषेध असो’, ‘घरगुती गॅसच्या किंमती कमी करा, अन्यथा खुर्ची खाली करा’, अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली; पण गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवून ठेवल्या. त्यामुळे महिला वर्गात नाराजी असून याला प्रत्युत्तर नक्कीच निवडणुकीत देणार, असे पडते यांनी सांगितले. आंदोलनाच्या ठिकाणी दगडी चुलीवर भाकरी बनवून महिला कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. यावेळी जिल्हाप्रमुख पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, संजय गांधी निराधार योजना माजी अध्यक्ष अतुल बंगे, ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, ओबीसी सेल तालुकाप्रमुख बंड्या खोत, युवासेना शहरप्रमुख संदीप महाडेश्वर, उपशहरप्रमुख गुरुनाथ गडकर, समन्वयक अमित राणे, आंबडपाल उपसरपंच गोट्या चव्हाण, नगरसेविका ज्योती जळवी, कुडाळ-मालवण महिला आघाडी संघटक श्रेया परब, तालुका संघटक स्नेहा दळवी, तालुका संघटक मथुरा राऊळ, पावशी सरपंच वैशाली पावसकर, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेवक उदय मांजरेकर, विभागप्रमुख गुरू सडवेलकर, बंड्या कोरगावकर, नितीन सावंत, बाळा वेंगुर्लेकर, बाळू पालव, मंगेश बांदेकर, बाळ धुरी, विभागप्रमुख दीपक आंगणे, सतीश कुडाळकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com