संक्षिप्त-वेतोरेत 29 ला विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-वेतोरेत 29 ला 
विविध कार्यक्रम
संक्षिप्त-वेतोरेत 29 ला विविध कार्यक्रम

संक्षिप्त-वेतोरेत 29 ला विविध कार्यक्रम

sakal_logo
By

कणकवलीत ४ एप्रिलला
निबंध स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार यांच्यावतीने ४ एप्रिलला निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सकाळी अकराला महावीर जयंती दिवशी बोर्डवे-कणकवली येथे होणार आहे. स्पर्धेत खुला गट आणि विद्यार्थी गट, असे दोन गट आहेत. खुलागट स्पर्धेतील विषय ‘जागतिक शांतता आणि जैन तत्त्वज्ञान’, ‘जैन धर्माची तत्वे अहिंसा सत्य असतेय ब्रह्मचर्य अपरिग्रहाचे महत्त्व’, ‘तीर्थ संस्थाने आधुनिक पर्यटनासाठी योग्य की अयोग्य’, असे तीन विषय आहेत. विद्यार्थी गटात भगवान महावीर जीवनदर्शन आणि शिकवण, महाराष्ट्रातील जैन तीर्थस्थाने, जैन तीर्थकांची परंपरा असे तीन विषय आहेत. सहभाग घेणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. उल्लेखनीय निबंधाचा उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येईल. खुल्या गटासाठी ८००, ५०, ३००, तर विद्यार्थी गटासाठी ५००, ३०० आणि २०० रुपये बक्षिसे आहेत. कोणत्याही एका विषयावर स्पर्धकाने निबंध लिहिणे अपेक्षित असून शब्द मर्यादा ८०० ते १००० आहे. निबंध एका बाजूने लिहावेत, निबंधाची भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, पहिल्या पृष्ठावर लेखकाने नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, वर्ग, ई-मेल, मोबाईल नंबर, इयत्ता, महाविद्यालयाचे नाव लिहावे. निबंध स्वतः किंवा पोस्ट कुरिअरद्वारे ३१ मार्चपर्यंत डॉ. दीपक तुपकर, शिवम अपार्टमेंट वैश्य वाडा येथे पाठवावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवारचे अध्यक्ष तुपकर यांनी केले आहे.
---
वराड-कुसरवेत क्रिकेट स्पर्धा
मालवण ः अ‍ॅड. रुपेश परुळेकर मित्रमंडळातर्फे मर्यादित षटकांची ‘एक गाव एक ग्रामपंचायत एक संघ’ टेनिस बॉल अंडरआर्म (बॉक्स नाईट) क्रिकेट स्पर्धा २४ ते २६ मार्च दरम्यान अ‍ॅड. रुपेश परुळेकर फिटनेस सेंटरनजीक वराड-कुसरवे येथे आयोजित केली आहे. विजेत्यास १० हजार ५५५ रुपये व चषक, उपविजेत्यास ६ हजार ५५५ रुपये व चषक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा.
--
वेतोरेत २९ ला विविध कार्यक्रम
वेंगुर्ले ः वेतोरे-गोसावीमठ येथील श्री देव भूतोबा मंदिरात २९ ला सकाळी दहाला धार्मिक कार्यक्रमानिमित्त श्रींची महापूजा, दुपारी बाराला आरती, एकला महाप्रसाद, रात्री साडेनऊला सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचे नाटक होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.