वेत्येत काजू, आंबा 
बागायतीला आग

वेत्येत काजू, आंबा बागायतीला आग

90592
वेत्ये : येथे आंबा काजू बागेला लागलेली आग.

वेत्येत काजू, आंबा
बागायतीला आग
सावंतवाडी, ता. २१ ः वेत्ये येथील काजू व आंबा बागायतीला आग लागल्याची घटना आज सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सावंतवाडी पालिकेचा बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला; मात्र तोपर्यंत बाग आगीत होरपळून गेली.
वेत्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या काजू बागायतीच्या बाजूनेच विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. या वाहिन्यांवर शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. सायंकाळी चारच्या सुमारास लागलेल्या या आगीचा भडका उडाल्याने काजू व आंबा कलमे होरपळून गेली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी ठरला. यात रमेश गावकर, जितेंद्र गावकर यांच्या बागेचे मोठे नुकसान झाले. वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरवर्षी शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतकरी बागायतदारांचे होणाऱ्या नुकसानीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com