‘गावऱ्हाठी’मधून गावातील तंटे सोडवा

‘गावऱ्हाठी’मधून गावातील तंटे सोडवा

90596
चौकुळ ः समन्वय समितीच्या वतीने गावचे प्रमुख व सलग २५ वर्षे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलेले अशोक गावडे यांचा सन्मान करण्यात आला.

‘गावऱ्हाठी’मधून गावातील तंटे सोडवा

चौकुळमध्ये सभेत आवाहन; ४० गावांच्या प्रतिनिधींची उपस्थिती


सांगेली, ता. २१ ः गावऱ्हाठी पुरस्कृत समन्वय समितीची सभा नुकतीच चौकुळ येथे झाली. यात गावातील मानपानावरून असलेले तंटे समितीच्या माध्यमातून सोडविण्याचे आवाहन करण्यात आले.
या सभेला ४० गावांतील देवस्थानाचे मानकरी, गाव चालक, प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ‘गावऱ्हाठी’ संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कोणत्याही गावात मानावरून भांडण तंटे असतील, तर ते समन्वय समितीच्या माध्यमातून मिटवावेत व गावातील रूढी, परंपरा, सण, उत्सव आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करून आपली संस्कृती टिकवावी, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
पूर्वजांनी घालून दिलेली ‘गावऱ्हाठी’ तरुण पिढीला समजावी, मंदिरांची स्थापना करत असताना व ‘बारस’ करत असताना त्यांच्या प्रथा, परंपरा कशा आहेत, अलिखित स्वरुपातील रुढी पुढे संक्रमित झाल्या पाहिजेत, म्हणून समन्वय समितीच्यावतीने दरवर्षी अशा सभा आयोजित केल्या जातात. चौकुळ गावातील ही आठवी सभा होती. यापूर्वी आंबोली, माडखोल, फणसवडे, उपवडे, गेळे, सांगेली, आंबेगाव या गावांत सभा झाल्या होत्या.
समन्वय समितीचे सचिव भरत गावडे यांनी प्रास्ताविकात गावऱ्हाठी समन्वय समितीचे महत्त्व सांगितले. चौकुळ गावाच्यावतीने आलेल्या मानकऱ्यांचे, गावचालकांचे ढोलताशांच्या गजरात औक्षण करून स्वागत केले. बरीच मंडळी पारंपरिक गणवेशात उपस्थित होती. या सभेला गजानन गावडे, शशिकांत गावडे, रुपा धुरी, पंढरी राऊळ, सुरेश गवस, आनंद मार्ये, बाळा गावडे, ज्ञानेश्वर परब, भरत गावडे, गोविंद लिंगवत यांनी मार्गदर्शन केले. समन्वय समितीतर्फे गेली २५ वर्षे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलेले अशोक गावडे यांचा सन्मान गजानन गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
--
चौकुशचा आदर्श घ्या
गावातील तंटे गावातच मिटविण्याची चौकुळची आदर्श परंपरा इतरांनी घ्या, असे आवाहन करण्यात आले. आंबोली, तेरवण, माडखोल, सातुळी, फणसवडे, आंबेगाव, कोलगाव, माणगाव, आंबेरी, वेर्ले, शिरशिंगे, देवसू, सांगेली, कालेली, बांदा, डेगवे, डोंगरपाल, कुंभवडे, उपवडे, निवजे, इसापूर, ओवळीये, कानूर, दाणोली, तेरवण मेढे, खडपडे, दुकानवाड, कुणकेरी आदी गावांचे प्रमुख उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com