सावंतवाडीत तरुणाचा
आकस्मिक मृत्यू

सावंतवाडीत तरुणाचा आकस्मिक मृत्यू

सावंतवाडीत तरुणाचा
आकस्मिक मृत्यू
सावंतवाडी : येथील जिमखाना परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेले काही दिवस तो आजारी होता. राजू जैस्वाल, असे त्याचे नाव आहे. तो मूळचा नेमका कुठला, याबाबत अधिक माहिती मिळाली नाही. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. राजू जैस्वाल हा शहरात जिमखाना परिसरात राहत होता. काल (ता. २०) सकाळी तो जिमखाना मैदानाशेजारी पडलेला आढळला. त्याला १०८ रुग्णवाहिकेने येथील उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. तेथे आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
.............
कासार्डे-तळेरेत आज शोभायात्रा
तळेरे ः गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी कासार्डे व तळेरे येथे उद्या (ता. २२) सकाळी नऊला शोभायात्रेचे आयोजन केले आहे. शोभायात्रेचा कासार्डे तिठा येथून प्रारंभ होणार असून तळेरे येथे प्रस्थान करणार आहे. शोभायात्रेत तळेरे येथील एसटी बसस्थालकासमोरील पुलाखाली लाठी-काठी, बनाटी, दांडपट्टा यासारख्या अनेक पारंपरिक खेळांचे, कलांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये कासार्डे-तळेरे पंचक्रोशीतील लेझीम पथक, चित्ररथ देखावे, वारकरी भजने, ढोल पथक, बैलगाडी आणि ट्रॅक्टरवरील देखाव्यांचाही समावेश आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नववर्ष स्वागत शोभायात्रा समिती कासार्डे-तळेरे पंचक्रोशीतर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com