मालवणातील ११ क्षय रुग्ण दत्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणातील ११ क्षय रुग्ण दत्तक
मालवणातील ११ क्षय रुग्ण दत्तक

मालवणातील ११ क्षय रुग्ण दत्तक

sakal_logo
By

90608
मालवण ः मातृत्व वरदान फाउंडेशन व पर्यटन व्यवसाय महासंघाच्या वतीने क्षय रुग्णांना सामुदायिक फूड बास्केट देण्यात आले.

मालवणातील ११ क्षय रुग्ण दत्तक

‘मातृत्व वरदान’चा पुढाकार; फूड बास्केट सहाय्य्य कार्यक्रम

मालवण, ता. २१ : मातृत्व वरदान फाउंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे क्षय रुग्णांसाठी सामुदायिक फूड बास्केट सहाय्य्य कार्यक्रमात ११ क्षय रुग्णांना दत्तक घेण्यात आले, अशी माहिती अध्यक्षा वैष्णवी मोंडकर यांनी दिली.
केंद्राने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाच्या कोरडा आहार फूड बास्केट योजनेंतर्गत मातृत्व वरदान फाउंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने कार्यक्रम पार पडला. यावेळी निक्षय मित्र संकल्पना महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी मांडली. यावेळी तालुक्यातील ११ क्षय रुग्णांना दत्तक घेण्यात आले. डॉ. शामराव जाधव यांच्याकडे ११ फूड बास्केट फाउंडेशन अध्यक्ष मोंडकर यांच्यामार्फत सुपूर्द करण्यात आली.
डॉ. जाधव यांनी व्यापार व समाजसेवेचे मार्गदर्शक कार्य मातृत्व वरदान फाउंडेशन व पर्यटन महासंघाकडून होत आहे. अशाप्रकारच्या कार्यारंभामुळे समाजातील अनेक लोक येणाऱ्या काळात मातृत्व वरदान फाउंडेशनच्या माध्यमातून क्षय रुग्णांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच क्षय रोगाविषयी माहिती दिली. मालवण तालुका पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे अवी सामंत यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व क्षय रुग्णांना टप्प्याटप्याने या योजनेंतर्गत दत्तक घेण्याचा मातृत्व वरदान फाउंडेशनचा उद्देश आहे. क्षय रुग्णांसाठी बनविलेल्या फूड बास्केटमध्ये तांदूळ, चणे, मूग, मटकी, गहू पीठ, शेंगदाणा, गूळ, दूध पावडर, खाद्यतेल यांचा समावेश करण्यात आला आहे. क्षय रुग्णाला हा कोरडा आहार दिला जाणार आहे. हा आहार कुठलीही एक वस्तू अथवा संपूर्ण फूड बास्केटच्या माध्यमातून व्यक्ती, सहकारी संस्था, वैयक्तिकरित्या क्षय रुग्णांना सहाय्य करून निक्षय मित्र बनू शकतो. या योजनेत फाउंडेशनच्या माध्यमातून सहभाग झालेल्यांना १२ ए, ८० जीच्या माध्यमातून कर लाभही प्राप्त होऊ शकतो, अशी माहिती अध्यक्ष मोंडकर यांनी दिली. यावेळी अवी सामंत, रविकिरण तोरसकर, दादा वेंगुर्लेकर, मनोज खोबरेकर, कैसर पठाण, मंगेश वाक्कर, मिलिंद झाड, दादू डिचोलकर, गौरव लुडबे यांच्यामार्फत क्षय रुग्णांना निक्षय मित्र योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आले. मातृत्व वरदान फाउंडेशन संयोजक महिमा मयेकर, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक मनोज मालंडकर, अमित सोनवडेकर, सागर मलये आदी उपस्थित होते.