मोचेमाड किनारी अनोळखी मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोचेमाड किनारी अनोळखी मृतदेह
मोचेमाड किनारी अनोळखी मृतदेह

मोचेमाड किनारी अनोळखी मृतदेह

sakal_logo
By

मोचेमाड किनारी अनोळखी मृतदेह
वेंगुर्ले,ता.२१ ः मोचेमाड (ता.वेंगुर्ले) समुद्रकिनारी सायंकाळी अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात नोंद झाली असून मृत व्यक्तीबाबत काही माहिती असेल तर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मोचेमाड येथील जीवरक्षक खवणेकर यांना आज सायंकाळी समुद्रकिनारी मृतदेह आढळला. याबाबत त्यांनी तातडीने वेंगुर्ले पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक केसरकर, पोलिस योगेश वेंगुर्लेकर, पोलिस सराफदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या व्यक्तीचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असून त्यांच्या अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट व हाफ पँट आहे; मात्र पाण्यामध्ये माशांनी मृतदेह खाल्ल्याने तो कुजला आहे. पोलिसांनी पंचनामा करून सदर मृतदेह शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात ठेवला.