पत्रकारितेतील बदल स्वीकारावेत

पत्रकारितेतील बदल स्वीकारावेत

90654
कुडाळ : ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्काराने चंद्रशेखर तांबट यांना सन्मानित करताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी. शेजारी रणजित देसाई, बापू नाईक, प्रशांत सातपुते, मोहन होडावडेकर, आफ्रिन करोल, उमेश तोरस्कर, विजय पालकर आदी.


पत्रकारितेतील बदल स्वीकारावेत

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी; कुडाळमध्ये पत्रकार पुरस्कार वितरण

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ : पत्रकारितेमध्ये होणारे बदल प्रत्येक पत्रकाराने अंगीकारले पाहिजेत. प्रशासनाकडून होणाऱ्या चुका आणि त्यांच्या कामाचे कौतुक हे पत्रकारांच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाते. ज्या चुका होतात, त्या सुधारण्याची संधीही पत्रकारांमुळे मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तहसीलदार अमोल पाठक, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, उद्योजक बापू नाईक, नगराध्यक्ष आफ्रिन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, ओरोस मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी राजन नाईक, माजी अध्यक्ष संजय पडते, अमरसेन सावंत, अतुल बंगे, दादा साईल, देवेंद्र सामंत, राजन नाईक, रुपेश पावसकर, प्रसाद गावडे, राजू गवंडे, जयराम डिगसकर, राजेश टंगसाळी, राकेश कांदे आदी उपस्थित होते.
यात ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार चंद्रशेखर तांबट (कणकवली). वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार भूषण देसाई (परुळे), छायाचित्रकार पुरस्कार राजन नाईक (कुडाळ) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पत्रकार क्षेत्रात काम करत असताना इतर क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये गुरू दळवी, राजन नाईक, वैशाली खानोलकर, नीलेश तेंडोलकर, दीपक तारी, अजित परब, विद्यार्थ्यांमध्ये कथ्थक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, अनुष्का सावंत, आस्था मर्गज, आर्या मर्गज, अथर्व मर्गज यांचा समावेश होता.
रणजित देसाई यांनी पत्रकारितेचे बाळकडू आम्हाला आजोबा भैय्यासाहेब वालावलकर यांच्या माध्यमातून घरातच मिळाले, असे सांगून त्या काळातील पत्रकारितेचा उलगडा केला. बापू नाईक, मोहन होडावडेकर, आफ्रिन करोल, उमेश तोरस्कर यांनी मार्गदर्शन केले. मृणाल सावंत हिच्या गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ओंकार सावंत या सहा वर्षीय मुलाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत ‘राजं आलं’, या गीतावर नृत्याविष्कार सादर केला. बंड्या जोशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. विजय पालकर यांनी प्रास्ताविक केले. अजय सावंत यांनी आभार मानले.
----
पत्रकारामुळे शांती व क्रांती
माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी पत्रकारितेला विशिष्ट असा कोणताही अभ्यासक्रम नाही, पत्रकाराला सर्वच विषयाचे ज्ञान असावे लागते. पत्रकार लेखणी रुपाने शब्द सिंचनाने समाज सुधारण्याचे काम करीत असतो. पत्रकाराच्या लेखणीमुळे शांती व क्रांती होते. ही क्रांती व शांती केव्हा करायची आहे, हे पत्रकारांवर अवलंबून असते, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com