कुडाळमध्ये नववर्षाचे दिमाखात स्वागत कुडाळात नववर्षाचे दिमाखात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमध्ये नववर्षाचे दिमाखात स्वागत
कुडाळात नववर्षाचे दिमाखात स्वागत
कुडाळमध्ये नववर्षाचे दिमाखात स्वागत कुडाळात नववर्षाचे दिमाखात स्वागत

कुडाळमध्ये नववर्षाचे दिमाखात स्वागत कुडाळात नववर्षाचे दिमाखात स्वागत

sakal_logo
By

90655
कुडाळ : येथे नववर्षानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळमध्ये नववर्षाचे दिमाखात स्वागत

मिरवणूक उत्साहात; ढोलपथकासह फुगडीमुळे मंगलमय वातावरण

कुडाळ, ता. २२ : गुढीपाडवा अर्थातच मराठी नववर्षानिमित्त आज येथे ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत भव्य मिरवणूक काढत चैतन्यमय, मंगलमय वातावरणात हे नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
मराठी नववर्षाला सुरुवात गुढीपाडव्याने होते. कोकणात विविध सणांपैकी गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण मानला जातो. यानिमित्ताने धर्मजागरण आणि देशप्रेमी विचारमंच यांच्यावतीने नववर्ष स्वागताचे आयोजन सकाळी करण्यात आले. श्री देव कुडाळेश्वर मंदिर ते जिजामाता चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे शमिका चिपकर हिच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले.
माता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पूण नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी वैद्य सुविनय दामले, मिलिंद देसाई, मनोज वालावलकर, जीवन बांदेकर, विवेक पंडित, अॅड. समीर कुलकर्णी, अभय वालावलकर, बंड्या सावंत, विवेक मुतालिक, अंजली वालावलकर, अंजली मुतालिक, संग्राम सावंत, रमा नाईक, उमेश नाडकर्णी, सतीश शेजवलकर, अदिती सावंत, श्रीधर गोरे, स्वरुप वाळके, अभय शिरसाट, बंटी तुळसुलकर, भगीरथ नाडकर्णी, कविता कुंटे, मोतिराम प्रभू, उन्मेषा दाभोलकर, डॉ. सुशांता कुलकर्णी, कोमल सामंत, मनाली पपाटकर, चैत्राली पाटील, विक्रम जांभेकर, निनी पाटणकर, नचिकेत देंसाई, जयेश रेडकर आदी उपस्थित होते.
--
लोककलांनी आली रंगत
जय भवानी जय शिवाजी, भारतमाता की जय, राजमाता जिजाऊ, वंदे मातरम्, राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराजांच्या नामघोषात ही मिरवणूक श्री कुडाळेश्वर मंदिर ते पान बाजार, पुन्हा समादेवी मंदिर, मारुती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधीचौक व जिजामाता चौक येथे समारोप करण्यात आला. श्री देव लिंगेश्वर ढोलपथक सोनवडे यांच्या ढोलपथकासह फुगडी महिलांच्या पारंपरिक लोककलांनी या मिरवणुकीत रंगत आली.