पाणी योजनेचे उद्घाटन

पाणी योजनेचे उद्घाटन

आंबव भुवडवाडीतील पाणी योजनेचे उदघाटन

सावर्डे ः आमदार शेखर निकम याच्या स्थानिक विकास निधीतून आंबव (पोंक्षे) भुवडवाडी येथे नळपाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेचे उदघाटन आमदार निकम यांच्या हस्ते करण्यात आले. आंबव भुवडवाडी येथे पाण्याची उपलबद्धता होती. पाणी घरोघरी पोहचवण्यासाठी नळपाणी योजनेची आवश्यकता होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार निकम यांनी निधी उपलब्ध करून वचनपूर्ती केली. ग्रामस्थांना घरोघरी पाणी मिळाले व अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली. ग्रामस्थांनी योजनेसाठी केलेली मागणी आमदार निकम यांनी दाखवलेली कार्यतत्परता यावर विश्वास ठेवून येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांचे आमदार निकम यांनी पक्षात स्वागत केले. आगामी काळात वाडीतील विकासकामे करण्याबाबत शब्द दिला. या वेळी सरपंच शेखर उकार्डे, उपसरपंच मंगेश मांडवकर, मोहन भुवड, सुरेश भुवड, दाजी भुवड, गणपत भुवड, सुनील भुवड, दीपक शिगवण, जितेंद्र भुवड, सुरेश घडशी, सुरेश कांगणे, सुशिल भायजे, माखजन गावचे सरपंच महेश बाष्टे, दत्ताराम सुतार उपस्थित होते.
-

आंबव पकडेवाडीत सार्वजनिक विहिरीचे उद्‍घाटन

सावर्डे ः आंबव (पोंक्षे) पकडेवाडी येथे सार्वजनिक विहिरीचे काम पूर्ण झाले. या विहिरीचे उदघाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार निकम यांनी विकास कामांबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व येणाऱ्या काळात गावातील विकास कामे टप्याटप्याने पूर्ण केली जातील असे ग्रामस्थांना आश्वासित केले. विहिरीच्या कामाचा पाठपुरावा सरपंच शेखर उकार्डे यांनी केल्याचे निकम यांनी सांगितले. या वेळी सरपंच शेखर उकार्डे, उपसरपंच मंगेश मांडवकर, गोविंद पकडे, अनंत पकडे, विजय पकडे, संजय पकडे, सुरेश घडशी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com