तळेरेत गोवा बनावटीची दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरेत गोवा बनावटीची दारू जप्त
तळेरेत गोवा बनावटीची दारू जप्त

तळेरेत गोवा बनावटीची दारू जप्त

sakal_logo
By

९०६८२


तळेरेत ४३.२० लाखांची
गोवा बनावटीची दारू जप्त

उत्‍पादन शुल्‍क विभागाची कारवाई

कणकवली, ता. २२ : मुंबई गोवा महामार्गावर तळेरे येथे मालवाहू टेम्‍पोमधून वाहतूक होणारी गाेवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. उत्‍पादन शुल्‍क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. टेम्‍पोमध्ये ४३ लाख २० हजार रूपये किंमतीचे ९०० दारूचे बॉक्‍स होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही कारवाई केली. टेम्पोचालक भाऊसाहेब दत्तू खरात (रा. वेताळनगर, केडगाव ता. दौड जिल्हा पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
गोवा ते पुणे या दरम्‍यान मालवाहू टेम्‍पोमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्‍याची खबर उत्‍पादन शुल्‍क विभागाला लागली होती. त्‍यानुसार उत्‍पादन शुल्‍क विभागाच्या पथकाने तळेरे येथील महामार्गावर टेम्‍पो अडवला. या टेम्‍पोची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. या प्रकरणी गोवा बनावटीच्या दारूसह टेम्‍पोही जप्त करण्यात आला आहे. तर टेम्पोचालक भाऊसाहेब खरात याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
कारवाईत उत्‍पादन शुल्‍क निरीक्षक प्रभात सावंत, एस.डी. पाटील दुय्यम निरीक्षक जे. एस. मानेमोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, महिला जवान स्नेहल कुबेसकर, वाहन चालक जगन चव्हाण आदी सहभागी झाले होते.