गुढीपाडव्याचे औचित्य साधून पुस्तकांची गुढी

गुढीपाडव्याचे औचित्य साधून पुस्तकांची गुढी

काही सुखद...................लोगो


rat२२p५.jpg -
९०६७७
राजापूर ः पुस्तक गुढीचे पूजन करताना विद्यार्थीनी.
rat२२p६.jpg-
९०६७८
राजापूर ः पुस्तक गुढीचे पूजन करताना मालती गोंडाळ
rat२२p७.jpg-
९०६७९
राजापूर ः पुस्तक गुढीच्या पूजनाच्यावेळी उपस्थित बी.के.गोंडाळ, महिला आणि विद्यार्थीनी.


गुढीपाडव्याचे औचित्य साधून पुस्तकांची गुढी

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रात उपक्रम ; पुस्तकेही भेट

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २२ ः तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक बी.के.गोंडाळ यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून जुवाठी येथील अक्षरमित्र स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये पुस्तकांची अनोखी गुढी उभी करण्याचा उपक्रम राबविला. ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती रूजविण्यासह समाजप्रबोधन करणारे विविधांगी उपक्रम राबविणारे गोंडाळ यांच्या पुस्तकांची गुढी उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती रूजण्यासाठी श्री. गोंडाळ गेल्या काही वर्षापासून वाचनालय निर्मितीचा उपक्रम राबवित आहे. त्यांच्या या उपक्रमाची प्रेरणा घेवून समाजातील अनेकांनी वाचनालय उभारणी केली आहे. काही समाजसेवकांनी या उपक्रमाला सहकार्यही केले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेली विधवा प्रथा बंद करण्यासाठी गोंडाळ विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहेत. ग्रामीण भागातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्यासाठी त्यांनी जुवाठी येथे स्वखर्चाने अक्षरमित्र स्पर्धा परिक्षा केंद्राची उभारणी केली आहे. या उपक्रमांच्या जोडीने ग्रामीण भागात सुरू केलेल्या अक्षरमित्र ग्रंथालय चळवळीचा अधिक प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने त्यांनी गुढी पाडव्याचे औचित्य साधून पुस्तकांची गुढी उभी करण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. यावेळी श्री. गोंडाळ यांच्यासह मालती गोंडाळ, विधवा माता, महिला, विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यावेळी वयोवृद्ध विधवा मातांच्या हस्ते पुस्तकांच्या गुढी समोर दीप्रज्वलन आणि गुढीला पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी महिला व विद्यार्थिनींनीही या पुस्तकांच्या गुढीचे पूजन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना श्री. गोंडाळ यांच्यावतीने वाचनासाठी पुस्तके भेट देण्यात आली. पुस्तकांची गुढी उभे करण्याच्या गोंडाळ यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
-
कोट

राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू केलेली अक्षरमित्र ग्रंथालय चळवळ राबविली जात आहे. या चळवळीचा समाजातील तळागाळामध्ये अधिक प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने गुढीपाडव्याच्या दिवशी पुस्तकांची गुढी हा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. त्याला महिलांसह विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बी.के.गोंडाळ
-
दृष्टीक्षेपात...
*शिक्षक बी.के.गोंडाळ यांचा पुढाकार
*वाचनालय निर्मितीचा उपक्रमही
*विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रबोधन
*अक्षरमित्र ग्रंथालय चळवळीचा प्रसार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com