लांजा शहरप्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाईना डच्चू

लांजा शहरप्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाईना डच्चू

लांजा शहरप्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाईना डच्चू

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ;नागेश कुरूप यांची निवड


लांजा,ता.२२ ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लांजा शहरप्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांची हकालपट्टी करण्यात आली असून नूतन शहर प्रमुख म्हणून नागेश कुरूप यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. संघटनात्मक कौशल्य असलेले नूतन शहर प्रमुख नागेश कुरूप यांना हे पद दिल्याने शहरातील शिवसैनिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर याचे पडसाद ग्रामीण भागापर्यंत पाहायला मिळाले. अशातच लांजा शहरातील नगरसेवक, आणि नगराध्यक्षांनी शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला लांजा शहरात जोरदार धक्का बसला होता. तेव्हापासूनच शहर प्रमुख गुरुप्रसाद देसाई यांची पदावरून हकालपट्टी केली जाणार अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शहर प्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांना न हटवल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये दिवसेंदिवस नाराजी निर्माण होऊ लागली होती. खुद्द खासदार विनायक राऊत हे देखील देसाई यांचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही होते. अखेर शिवसेना शहर प्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांची हकालपट्टी करण्यात आल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.गेली अनेक वर्ष शिवसेनेची निष्ठावंत असलेले आणि संघटनात्मक कौशल्य असलेले नूतन शहर प्रमुख नागेश कुरूप यांना हे पद दिल्याने शहरातील शिवसैनिकांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com