
लसीकरण
सावर्डे येथे औधोगिक प्रशिक्षण संस्थेत लसीकरण
सावर्डे ः प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे यांच्या माध्यमातून सह्याद्री शिक्षण संस्थेच्या औधोगिक प्रशिक्षण संस्था सावर्डे येथे धनुर्वात लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये १०१ विद्यार्थ्यांना धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर पूनम राणीम व त्यांच्या सहकाऱ्यानी लसीकरण केले. प्रास्ताविक प्राचार्य उमेश लकेश्री यांनी केले त्यांनी विद्यार्थी शिक्षण घेत असताना विविध धातूमुळे शरीरावर अपायकारक परिणाम होण्याची शक्यता बळावते व आरोग्य धोक्यात येते यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असे त्यानी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी धनुर्वात प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास आय.टी.आय.तील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
-
खाण्यापिण्याऐवजी पुस्तकांवर खर्च करा
सावर्डे ः पैसा हा फक्त खाण्यापिण्यावर खर्च करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी त्याची पुस्तकं घेऊन आपलं जीवन संपन्न करावं मत जागतिक कविता दिनानिमित्त वकील संभाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय सावर्डे येथे बोलत होते.
जागतिक कविते दिनाचे महत्त्व सांगताना कवितेची निर्मिती कशी होते ते त्यानी विषद केले. जे कलाकार जन्माला आले त्याचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. कवीनी सौंदर्य अगदी कमीत कमी शब्दात सर्वांपर्यंत पोहोचवून एक डोळसदृष्टी देण्याचा प्रयत्न अनेक कविता लेखनातून झाले आहे .यावेळी मोहिते यांनी आपल्या काही कविता संग्रहातील कविता गाऊन दाखवल्या. मध्यान सूर्य डोक्यावर'' ही कविता आजच्या वडिलांचे प्रतिनिधित्व करते असे सांगून आईवर अनेक कविता झाल्या पण वडिलांवर, त्यांचे विचार, मन, मुलांचे विषय असणारा आदर्श त्या संदर्भात कवितेचे महत्त्व सांगितले. मळलेल्या रस्त्यावर कोणी जाईल पण एक वेगळी वाट कविला स्वतःला करावी लागते असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राध्यापक तानाजी कांबळे यांनी केले.
-
प्रत्येक कुटुंबांना कचरा कुंड्यांचे वाटप
दापोली : तालुक्यातील चिखलगाव येथे स्वच्छ भारत मिशन टप्पा क्रमांक २ मध्ये स्वावलंबनाचे महत्व व सातत्य टिकविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी घरगुती ओला आणि सुका कचरा संकलन करण्यासाठी चिखलगाव, मळे, देवके आणि किन्हळ येथील गावातील प्रत्येक कुटुंबांना कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लोकमान्य टिळक यांच्या चिखलगावातील स्वच्छतेचा हा आदर्श दापोली तालुक्याला दिशा देणारा ठरणारं आहे.
चिखलगाव नावाने असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात खास महिलांची एक विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या महिला ग्रामसभेत कुंटुंबाला घरगुती ओला आणि सुका कचरा संचलन करण्यासाठी प्रत्येक कुंटुंबाला कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. चिखलगावातील स्वच्छतेच्या आदर्श तालुक्याला दिशा देणारा ठरेल अशाप्रकारे विश्वास ग्रामसेवक अनंत कोळी यांनी व्यक्त केला. स्वच्छ भारत मिशन टप्पा क्रमांक २ मध्ये चिखलगाव ग्राम पंचायतने तालुक्यात मॉडेल व्हिलेज बनविण्याचा सर्वप्रथम मान पटकाविला, असे त्यांनी सांगितले.
-