वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्थांना एकत्र या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्थांना एकत्र या
वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्थांना एकत्र या

वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्थांना एकत्र या

sakal_logo
By

वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्थांनी एकत्र यावे

भाऊ काटदरे ः आम्ही मिळून सारे, कार्यक्रमात निसर्गप्रेमींचा सत्कार

चिपळूण, ता. २२ : चिपळूण शहरात १५० पेक्षा अधिक सामाजिक संस्था आहेत. या संस्थेशी संलग्न सुमारे दोन हजार कार्यकर्ते आहेत. प्रत्येक वर्षी दोन हजार वृक्ष लागवड केल्यास त्याचे जतन करणे सोपे जाईल. यासाठी सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र या, असे आवाहन निसर्गसेवक व सह्याद्री निसर्ग मित्राचे प्रमुख भाऊ काटदरे यांनी केले.
चिपळूण येथे झालेल्या आम्ही मिळून सारे या वन संरक्षक संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही मिळून सारे या निसर्ग संवर्धन हे उद्दिष्ट ठेवून काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने तीन निसर्ग सेवक शौकत मुकादम, केतन माजलेकर, प्रसाद साडविलकर यांचा सत्कार श्री. काटदरे, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निसर्ग सेवक भाऊ काटदरे यांनी प्लास्टिक बॉटल्स संकलन करणे किती फायद्याचे आहे आणि त्यामुळे निसर्गाचे कसे रक्षण होते याची माहिती दिली. मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडल्यामुळे जमिनीची होणारी धूप याची माहिती देऊन वृक्ष लागवड करणे का महत्वाचे हे विषद केले. प्राणी व पक्षी हे निसर्ग सेवक आहेत असे काटदरे यांनी सांगितले. यावेळी शौकत मुकादम यांनी वृक्ष लागवड व जतन करताना शासकीय अधिकाऱ्यांकडून आलेले अनुभव सांगितले. वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेमध्ये प्राणी आणि पक्षी संवर्धनाचे सुद्धा काम केले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी पालिकेने केलेली वृक्ष लागवड याची माहिती दिली. या कार्यक्रमाची प्रास्ताविक निसर्गसेवक शशिकांत मोदी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लीना जावकर व आभार प्रदर्शन दिलीप आंब्रे यांनी मानले. कार्यक्रमामध्ये युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागाच्या विद्यार्थीनी निसर्गगीत म्हटले. यावेळी परिमल ग्रुपने निसर्ग संवर्धन बाबतची छानशी नाटुकली सादर केली. डॉ. रत्नाकर थत्ते व मिलन गुरव यांनी औषधी वनस्पतीबाबत माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, आशिष खातू, संगीता रानडे, शैलेश टाकळे, वैशाली शिंदे, आदिती देशपांडे, सीमा चाळके, राणी महाडिक, अर्चना कारेकर, रविना गुजर, संध्या मेहता, विना जावकर, वर्षा खटके आदी निसर्ग प्रेमी नागरिक रामतीर्थ गार्डन येथे उपस्थित होते.