
सावंतवाडीत नववर्षानिमित्त मनविसेतर्फे जिलेबी वाटप
90728
सावंतवाडी ः नववर्षानिमित्त जिलेबी वाटप करताना मनविसे कार्यकर्ते.
सावंतवाडीत नववर्षानिमित्त
मनविसेतर्फे जिलेबी वाटप
सावंतवाडी ः गुढीपाडवा व नववर्षानिमित्त सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने येथील राजवाडा परिसर तसेच बसस्थानक परिसरात जिलेबी वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदू सण तसेच मराठी या मुद्द्यांसाठी नेहमीच अग्रेसर असते. आज नवीन वर्षाचे औचित्य साधून जिलेबी वाटपाचा कार्यक्रम मनसेच्यावतीने आनंद उत्सव म्हणून करण्यात आला. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी उपशहराध्यक्ष प्रवीण गवस, शुभम सावंत, दर्शन सावंत, मनीष सावंत, मंदार सुभेदार, गोविंद सोनी, अनुप सोनी आदी उपस्थित होते.
आचरा येथे आज धार्मिक कार्यक्रम
आचरा ः श्री स्वामी समर्थ महाराज गृहमठ आचरा (सुनील खरात यांच्या निवासस्थानी) पटेल सॉमिल नजीक, कणकवली रोड, आचरा येथे उद्या (ता. २३) श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी ५.४५ वाजता श्रींना दुग्धाभिषेक, सातला नित्य आरती, नऊला महाभिषेक, दुपारी बाराला महाआरती, एकला महाप्रसाद, सायंकाळी सातला नित्य आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा. ज्यांना अन्नदान सेवेसाठी मदत करायची असेल त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.