लोटे बोरवाडी ते गावदेवी मंदिर रस्त्याचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोटे बोरवाडी ते गावदेवी मंदिर रस्त्याचे भूमिपूजन
लोटे बोरवाडी ते गावदेवी मंदिर रस्त्याचे भूमिपूजन

लोटे बोरवाडी ते गावदेवी मंदिर रस्त्याचे भूमिपूजन

sakal_logo
By

लोटे बोरवाडी ते गावदेवी मंदिर रस्त्याचे भूमिपूजन

चिपळूण ः खेड तालुक्यातील लोटे बोरवाडी, विठ्ठलवाडी ते गावदेवी मंदिर रस्त्याची बिकट परिस्थिती झाली होती. या मार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होती. गुहागर विधानसभा तालुकाध्यक्ष चंद्रकांत चाळके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्यासाठी १६ लाखाचा निधी मिळाला. डोंगरी विकास कार्यक्रम २०२१-२०२२ मधुन आमदार भास्कर जाधव यांच्या निधीतून खडीकरण, डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन माजी जिल्हापरिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाला खेड उपतालुकप्रमुख विजय साळुंखे, लोटे ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत सदस्य संकेत चाळके, नितीन कडू, नीलिमा चाळके, अध्यक्ष सुरेश चाळके, गंगाराम चाळके, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार चाळके, रवी गोवळकर, संजय चाळके, सुभाष चाळके, बुवा सावंत,सुरेश चाळके विलास कडू, अंकुश चाळके, बाळाराम चाळके, समीर शिंदे, ओमकार चाळके, विश्वनाथ चाळके, विवेक चाळके, रोहित चाळके विष्णू आंब्रे ,अजित चाळके, कमलाकर चाळके आदी उपस्थित होते.