मुख्यमंत्र्यांच्या सभेने एसटीचे उखळ पांढरे

मुख्यमंत्र्यांच्या सभेने एसटीचे उखळ पांढरे

मुख्यमंत्र्यांच्या सभेने एसटीचे उखळ पांढरे

१०८ गाड्यांमुळे साडे चौदा लाख उत्पन्न ; तोटा कमी

रत्नागिरी, ता. २२ : रत्नागिरी एसटी विभागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेड येथील सभा चांगलीच फायदेशीर ठरली आहे. या सभेला जिल्ह्यातील पाच आगारातून एकुण १०८ बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. त्यामुळे सभेला चांगलीच गर्दी होऊन या सभेची राजकीय चर्चा झाली. मात्र त्याबरोबर एसटी महामंडळाचेही उकळ पाढरे झाले असून यातून एसटीला एका दिवसात १४ लाख ५० हजार एवढे उत्पन्न मिळाल्याने तोटा कमी करण्यास चांगलाच हातभार लागला.

सभेसाठी जिल्ह्यातील पाच ते सात आगारातून १०८ एसटी गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. माणसांच्या संख्येनुसार गाड्यांचे आरक्षण केले होते. या सभेचा आपसुक फायदा एसटीला झाला. दापोली, खेड, चिपळूण, आगारातून ३१, खेड २५, चिपळूण २७, रत्नागिरी ९ व देवरुख आगारातून ६ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. सभेला सोडणे आणि सभा संपल्यानंतर पुन्हा आणून सोडण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर होती. या सभेमुळे एका दिवसात एसटी विभागाला साडे १४ लाखाचे उत्पन्न मिळाले.
-
असाही एसटी आरक्षणाचा फायदा

कोणत्याही राजकीय सभेला बाहेरून माणसे आणल्याचा आरोप केला जातो. सभेच्या गर्दीचा दावा खोडण्यासाठी हा फंडा हमखास वापरला जातो. अशावेळी माणसे स्थानिकच होती, हे सिद्ध करायची वेळ आली तर एस.टी.चे आरक्षण अधिक उपयुक्त ठरते. बसेस कोणकोणत्या भागातून आल्या याचे रेकॉर्ड आपोआप मिळते. त्यामुळे आमच्या सभेची माणसे मतदार संघातीलच असल्याचे सांगण्यासाठी एस.टी. बसेसचा वापर अधिक उपयुक्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com