विस्टाडोममधून 23,939 प्रवाशांनी घेतले कोकण दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विस्टाडोममधून 23,939 प्रवाशांनी घेतले कोकण दर्शन
विस्टाडोममधून 23,939 प्रवाशांनी घेतले कोकण दर्शन

विस्टाडोममधून 23,939 प्रवाशांनी घेतले कोकण दर्शन

sakal_logo
By

90692


विस्टाडोममधून 2४ हजार
प्रवाशांना कोकण दर्शन
जनशताब्दी एक्स्प्रेसः रेल्वेच्या तिजोरीत भर
रत्नागिरी, ता. २२ः पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाच्या मार्गावरील रेल्वे गाड्यांना विस्टाडोम कोच जोडले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत भर पडत आहे. मध्य रेल्वेने सुरु केलेल्या व्हिस्टाडोम कोचना चांगला प्रतिसाद मिळाला असून एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सव्वा लाखांहून अधिक प्रवाशांनी या कोचमधून प्रवास केला आहे. त्यात मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या विस्टाडोम कोचमधून वर्षभरात २३ हजार ९३९ प्रवाशानी प्रवास केला.
मध्य रेल्वेच्या विस्टाडोम कोचेसनी वर्षभरात १ लाख २९ हजाराहून अधिक प्रवाशांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. मध्य रेल्वे मुंबईहून गोवा तसेच पुणे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये व्हिस्टाडोम कोच चालवले आहेत. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार विस्टाडोम कोचमध्ये छतावर पारदर्शक काचा बसवल्या आहेत. विस्टाडोम कोचच्या रचनेमुळे प्रवाशांना मुंबई-गोवा रेल्वे मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांचे तर मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाच्या चित्तथरारक दृश्यांचा आनंद घेणे कोचला असलेल्या रुंद आणि पारदर्शक खिडक्यांमुळे शक्य झाले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत, विस्टाडोम कोचने १.२९ लाख प्रवाशांकडून १७.१६ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये एकट्या मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या विस्टाडोम कोचमधून वर्षभरात २३ हजार ९३९ प्रवाशानी प्रवास केला. या कालावधीत कोचचे भारमान शंभर टक्केपेक्षा जास्त ठेवण्यात गाडीला यश आले आहे. त्यामुळे या गाडीला मागील वर्षभरात ४ कोटी ७२ लाख रुपये इतका महसूल मिळाला आहे. याचबरोबर पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनने २.०३ कोटींच्या कमाई केली. डेक्कन एक्सप्रेसमधुन २७,३७० प्रवाशांनी प्रवास केला आहे. डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, जनशताब्दी, प्रगती एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या लोकप्रिय गाड्यांमध्ये हे डबे जोडल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विस्टाडोम कोच प्रवाशांना आकर्षित करत आहेत. यापैकी मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-करमाळी तेजस एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम डबे गेल्या वर्षी जुलै आणि सप्टेंबरमध्ये जोडले होते.