जिल्ह्यात झिरो पेन्डसी मोहिमेचे तीन तेरा

जिल्ह्यात झिरो पेन्डसी मोहिमेचे तीन तेरा

जिल्ह्यात झिरो पेन्डसी
मोहिमेचे तीन तेरा
आमदार प्रसाद लाड; महसूल विभागात २५ टक्के पदे रिक्त
रत्नागिरी, ता. २२ : रत्नागिरी महसुल विभागातील १ हजार १५२ मंजुर पदांपैकी २५ टक्के पदे रिक्त आहेत. शासनाची झिरो पेन्डसी मोहिमजिल्ह्यात सुरु असून या रिक्त पदांमुळे मोहिमेचे तीन तेरा वाजले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कामांसाठी खेपा माराव्या लागत आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांच्यावरील ताण वाढत आहे. सर्वमान्यांना न्याय देण्यासाठी रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
प्रसाद लाड यांनी विशेष उल्लेखातून या रिक्तपदांची मागणी विधान परिषदेत केली. शासनाची झिरो पेन्डसी मोहिमेची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात सुरु आहे. महसूल विभागात १ हजार १५२ मंजूर पदांपैकी २५ टक्के पदे रिक्त आहेत. तरी गेल्या चार वर्षात पदभरती न झाल्याने ८१२ पदापैकी २९५ पदे रिक्त आहेत. यामुळे या झिरो पेन्डसी मोहिमेचे तीन तेरा वाजले आहेत. जिल्ह्यात उप जिल्हाधिकारी पदासाठी २, तहसीलदार पदासाठी ६, नायब तहसीलदार पदासाठी १७, लघु लेखक निम्ह पदासाठी ४, अव्वल कारकून ७, मंडल अधिकारी ५, तलाठी ८७ महसूल सहाय्य्क ८८, शिपाई २३, अशी एकूण २८१ पदे असून या विभागातील वाढत्या रिक्त पदाचा भुर्दंड सामान्यांना सहन करावा लागतो. महसूल विभागाचा कारभार सुरळीत चालावा यासाठी तसेच कार्यरत असलेल्या कर्मचारीवर्गाचा कामाचा ताण कमी करावा यासाठी शासनाने सदर पदे लवकर भरावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com