सातार्डाचे माजी सरपंच मांजरेकर यांची आत्महत्या

सातार्डाचे माजी सरपंच मांजरेकर यांची आत्महत्या

90743
व्यंकटेश मांजरेकर

सातार्डाचे माजी सरपंच
मांजरेकर यांची आत्महत्या
सावंतवाडी, ता. २२ : सातार्डा गावचे माजी सरपंच व्यंकटेश शांबा मांजरेकर (वय ८९) यांनी घरासमोरील फणसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मांजरेकर यांनी बारा वर्षे सातार्डा ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले. त्यांना गेले काही दिवस दृष्टीदोष झाला होता. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. त्यांच्या डोळ्यांवर सहा वर्षांपासून उपचार सुरू होते. दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली होती. महागडे उपचारही सुरू होते. असे असतानाही अलीकडे त्यांना अस्पष्ट दिसत होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. आत्महत्या केल्याची खबर त्यांचा मुलगा महेंद्र मांजरेकर यांनी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करण्यात आले. पश्चात पत्नी, मुली, दोन मुलगे, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील सातार्डा मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष महेंद्र मांजरेकर यांचे ते वडील होत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com