
पहिलीच्या विद्यार्थ्यांचे बांदा केंद्रशाळेत स्वागत
९०७४४
पहिलीच्या विद्यार्थ्यांचे
बांदा केंद्रशाळेत स्वागत
बांदा, ता. २२ ः जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागत करण्यात आले.
दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होत असते. उपक्रमशील शाळा व जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेत गुढीपाडव्यानिमित्त पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांचे कोल्हापूरी फेटे बांधून औक्षण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या वतीने पेढा भरवून विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी पालकांनी शाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये, उपशिक्षक जे. डी. पाटील, प्रशांत पवार, गोपाळ साबळे, पालक संतोष मंजीलकर, प्रणाली बांदेकर, संचिता मंजीकलकर, अंकुश ठाकूर आदी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.