
गुढीपाडवा तारका स्पर्धेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
rat22p17.jpg-
90747
रत्नागिरी : गुढीपाडवा तारका स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर, परीक्षक मंडळी.
गुढीपाडवा तारका स्पर्धेला
महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
रत्नागिरी : हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषेत शेकडो महिला, मुली सहभागी झाल्या. आपल्या परंपरेचे जतन करणाऱ्या महिलांमधून समीक्षा पाडाळकर, अबोली शेट्ये, माधुरी वाघोले, गौरी देवळे, मधुरा ढेकणे आणि संजना नार्वेकर या सहा जणींना गुढीपाडवा तारकांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. स्वागत यात्रेमध्ये फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या कांचन डिजिटल फोटो स्टुडिओतर्फे व श्री गणेश वस्त्र निकेतनचे संजू जैन यांनी गुढीपाडवा तारका ही अनोखी स्पर्धा आयोजित केली. या वेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या, विशेष साजशृंगार केलेल्या पाच महिलांची निवड केली होती. परीक्षक म्हणून जान्हवी पाटील, मिताली भिडे, अमृता मायनाक, रोशनी सुर्वे, शिवानी भोळे यांनी काम पाहिले. गुढीपाडवा तारकांना पतितपावन मंदिरात सांगता कार्यक्रमावेळी अक्षता जैन, बिना गणेश भिंगार्डे, मधुरा कांचन मालगुंडकर, संगीता शहा, डिंपल गुंदेचा, भारती जैन, कांचन मालगुंडकर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामदैवत श्री भैरी मंदिर ते पतितपावन मंदिर आणि मारुती मंदिर पासून पतितपावन मंदिरपर्यंत स्वागत यात्रा काढण्यात आली. या संपूर्ण स्वागत यात्रेचे नियोजन फोटोग्राफर कांचन मालगुंडकर व त्यांच्या टीमने केले होते.