दापोलीत मटका जुगाराचे साहित्य जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोलीत मटका जुगाराचे साहित्य जप्त
दापोलीत मटका जुगाराचे साहित्य जप्त

दापोलीत मटका जुगाराचे साहित्य जप्त

sakal_logo
By

दापोलीत मटका जुगाराचे साहित्य जप्त
दाभोळ : दापोली बस स्थानकासमोर असलेल्या एका टपरीच्या आडोशाला उभा असलेल्या एका व्यक्तीकडून दापोली पोलिसांनी मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून संशयिता विरोधात दापोली पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता २१ ) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास दापोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत दापोली बस स्थानकाच्या समोर असलेल्या एका टपरीच्या आडोशाला उभ्या असलेल्या रोशन संजय नरवणकर यांच्याकडे मटका जुगाराचे साहित्य व रोख रुपये १ हजार ६२० मिळाले, हे साहित्य जप्त करण्यात आले. संशयित नरवणकर यांचे विरोधात दापोली पोलीसात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हेड कोनस्टेबल अशोक गायकवाड करत आहेत.