देवगडमध्ये नववर्षाचे शोभायात्रेने स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये नववर्षाचे शोभायात्रेने स्वागत
देवगडमध्ये नववर्षाचे शोभायात्रेने स्वागत

देवगडमध्ये नववर्षाचे शोभायात्रेने स्वागत

sakal_logo
By

90765
जामसंडे : येथील शोभायात्रेत महिलांनी लेझीम नृत्य सादर केले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडमध्ये नववर्षाचे शोभायात्रेने स्वागत
देवगड, ता. २२ : येथील देवगड जामसंडे शहरात आज गुढीपाडवा नववर्षानिमित्त सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेश, ढोलताशांचा गजर आणि लेझीमचा फेर अशा मंगलमय वातावरणात हिंदू नववर्षाचे उत्साही स्वागत करण्यात आले. महिलांसह लहान मुलेही लेझीम पथकात सहभागी झाली होती.
देवगड व जामसंडे शहरात आज दुपारपासून ढोलताशांचा गजर घुमत होता. येथील किल्ला मारुती मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. चौकाचौकांत महिलांनी फेर धरला होता. लेझीमचा ताल आणि ढोलताशांचा गजर अशा वातावरणात उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. जामसंडे परिसरातही शोभायात्रा काढण्यात आली. सांस्कृतिक भवन येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. बाजारपेठेमध्ये महिलांनी लेझीम नृत्य केले. दिर्बादेवी मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत विविध मान्यवर, नागरिक सहभागी झाले. सायंकाळी उशिरापर्यंत शोभायात्रा उत्साहात सुरू होती. यामध्ये चित्ररथांचाही समावेश होता.