दोन दुचाकींच्या धडकेत
नेरुरमध्ये दोघे जखमी

दोन दुचाकींच्या धडकेत नेरुरमध्ये दोघे जखमी

90768
नेरुर ः अपघातग्रस्त दुचाकी.

दोन दुचाकींच्या धडकेत
नेरुरमध्ये दोघे जखमी
कुडाळ, ता. २२ ः कुडाळ-कवठी मार्गावर नेरुर चौपाटी येथे दोन दुचाकींमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले. हा अपघात आज सायंकाळी झाला. जखमींवर कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
यातील एक दुचाकीस्वार चेंदवण येथून कुडाळच्या दिशेने, तर दुसरा कुडाळहून जात होता. दोन्ही दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात दोघेही स्वार रस्त्यावर पडून जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमींचा जबाब घेत पुढील कार्यवाही सुरू केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com