आनंदाचा शिधा अजूनही गोदामातच

आनंदाचा शिधा अजूनही गोदामातच

swt२३५.jpg
९०८१४
कणकवलीः येथील धान्य गोदामात दाखल झालेले पामतेल (छायाचित्र ः तुषार सावंत)

आनंदाचा शिधा अजूनही गोदामातच
लवकरच वितरणः हिंदू नववर्षासाठी होणार होते वितरण
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २३ः राज्याने यंदा शिधापत्रिकाधारक नागरिकांची दिवाळी गोड केली; पण गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाचे स्वागत करताना जाहीर केलेला आनंदाचा शिधा अजूनही गोदामातच अडकला आहे. शासकीय कर्मचारी संपामुळे रखडलेले या शिध्याचे वितरण हळूहळू सुरू झाले आहे. कणकवलीतील पुरवठा विभागाच्या गोदामात आज पामतेल दाखल झाले. विलंबाने का असेना, आता येत्या काही दिवसांत प्रत्येक रेशन दुकानावर प्रति शंभर रुपये याप्रमाणे आनंदाचा शिधा कीट वितरित केले जाणार आहे. पामतेलासह डाळ, रवा, साखर हे कीट नववर्षासाठी भेट म्हणून दिले जाणार आहे. येत्या १४ एप्रिलपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत हा शिधा लोकांपर्यंत वितरित केला जाणार आहे. कणकवली तालुक्यातील २६ हजार ५३७ लाभार्थींना हे कीट प्रत्येक रेशन दुकानावर उपलब्ध होणार आहे.
राज्याच्यावतीने यंदा आनंदाचा शिधा दिवाळीप्रमाणे गुढीपाडव्याला हिंदू नववर्षापूर्वी वितरित केला जाणार होता; पण सरकारी कर्मचारी संपामुळे वितरण व्यवस्था कोलमंडून पडली. संप मिटल्यानंतर या आनंदाच्या शिध्याचे वितरण सुरू झाले आहे. यासाठी एका कीटमध्ये एक किलोप्रमाणे डाळ, साखर, रवा आणि एक लिटर तेल पिशवी दिली जाणार आहे. नियमित धान्यासोबतच या आनंदाच्या शिधाचे वितरण केले जाणार आहे. कणकवली तालुक्यामध्ये २६ हजार ५३७ कार्डधारक आहेत. यासाठी सद्यस्थितीमध्ये कणकवलीच्या धान्य गोदामात एक लिटरच्या २० हजार पिशव्या प्राप्त झाल्या आहेत. चणाडाळ एक किलो प्रमाणे २५ हजार किलो, साखर २६ हजार ५३७ किलो, रवा २५ हजार किलो अजूनही गो़दामात पोहोचलेला नाही. तालुक्यात अंत्योदय लाभार्थी ४ हजार १२० असून प्राधान्य कुटुंबे २२ हजार २७३ इतकी आहेत. या शिधापत्रिकाधारकांना तालुक्यातील ७३ रेशन दुकानांच्या माध्यमातून लवकरच या आनंद शिधाचे वितरण सुरू होणार आहे. यासाठी वाहनाच्या माध्यमातून प्रत्येक रेशन धान्य दुकानावर हा साठा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक रेशन दुकानदाराकडून आगाऊ प्रत्येक कार्डधारकाचे शंभर रुपये चलन भरून घेण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक कीटमागे एका धान्य दुकानदाराला सहा रुपये इतके वितरण व्यवस्थेतील कमिशन दिले जाणार असून शासन केवळ ९४ रुपयांमध्ये आनंद शिधा कीट साहित्य उपलब्ध करून देणार आहे. कणकवलीत धान्य गोडाऊनमध्ये सध्या हे साहित्य उतरवून घेण्यात येत आहे. हे धान्य ग्रामीण भागातील रेशन धान्य दुकानांवर पोहोचविले जाणार आहे.
-----------
कोट
कणकवलीतील ७३ धान्य दुकानांमध्ये लवकरच आनंदाच्या शिध्याचे कीट वितरित केले जाणार आहेत. त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. संपाच्या अचडणीमुळे ग्राहकांना त्यांच्या रास्त दुकानात गुढीपाडव्याला आनंदाचा शिधाचे कीट प्राप्त झाले नाही; पण तालुक्याचा साठा दोन ते चार दिवसांत मिळेल. चांगल्या दर्जाचे धान्य ग्राहकांना केवळ शंभर रुपयांत मिळणार आहे.
- ममत तांबे, गोदाम निरीक्षक
..............
चौकट
कणकवलीतील स्थिती
एकूण कार्डधारक ः २६ हजार ५३७
अंत्योदय लाभार्थी ः ४ हजार १२०
प्राधान्य कुटुंबे ः २२ हजार २७३
एकूण रेशन दुकाने ः ७३
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com