पावस ः कुर्धे प्रथमच काढलेल्या स्वागतयात्रा उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस ः कुर्धे प्रथमच काढलेल्या स्वागतयात्रा उत्स्फूर्त प्रतिसाद
पावस ः कुर्धे प्रथमच काढलेल्या स्वागतयात्रा उत्स्फूर्त प्रतिसाद

पावस ः कुर्धे प्रथमच काढलेल्या स्वागतयात्रा उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२३p१.jpg ः KOP२३L९०८१७ पावस ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ.
-----------

कुर्धेतील स्वागतयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पावस, ता. २३ ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे नववर्ष स्वागतयात्रा थाटात पार पडली. पावस पंचक्रोशीत प्रथमच काढलेल्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे स्वागत या यात्रेने करण्यात आले.
शहरातून गेली अनेक वर्षे नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात येते; मात्र ग्रामीण भागात ही प्रथा फारशी नाही. कुर्धे गावातील ग्रामस्थांनी यंदा नववर्ष स्वागतयात्रा आयोजित केली होती. दुपारी ३ ते ५ या वेळेत बंडबेवाडी येथून ही यात्रा निघून देशमुखवाडी, शिंदेवाडीमार्गे कुर्धे हायस्कूलच्या मैदानावर यात्रेची सांगता झाली. रत्नागिरी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महामार्ग संपर्क प्रमुख प्रकाश रिसबूड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या या यात्रेत कुर्धे गावातील ग्रामस्थांसह मेर्वी, पूर्णगड, गणेशगुळे या गावातील सुमारे १०० गावकरी सहभागी झाले होते. सोबतच्या चित्ररथात मराठी शाळेतील लहान मुले राम, सीता, लक्ष्मण, राधा, कृष्ण यांच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. ढोल, ताशे आणि लेझिमच्या तालात भगवे झेंडे आणि घोषणांच्या साथीत उत्साहपूर्ण जल्लोषात झालेली ही स्वागतयात्रा अनेकांच्या उत्सुकतेचा, चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनली होती. स्वागतयात्रेचा हेतू आणि सकल हिंदू समाजाच्या संघटनेची गरज विषद करून स्वागतयात्रा नियोजन समितीने इथून पुढे दरवर्षी नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्याचा मानस या प्रसंगी व्यक्त केला.