रत्नागिरी- साहित्यिक गुढी राहिली उभी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- साहित्यिक गुढी राहिली उभी
रत्नागिरी- साहित्यिक गुढी राहिली उभी

रत्नागिरी- साहित्यिक गुढी राहिली उभी

sakal_logo
By

-rat२३p७.jpg- KOP23L90823 रत्नागिरी : जनेसवा ग्रंथालयातर्फे साहित्यिक गुढी उभारण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित कर्मचारी आणि वाचक, साहित्यिक पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात साहित्यिक गुढीत लावण्यात आलेल्या साहित्य पताका.
------------
साहित्याची, वाचनाची गोडी लाव रे म्हाराजा

जनसेवा ग्रंथालय ; साहित्यिक गुढीत घुमले गार्‍हाणे
रत्नागिरी, ता. २३ : ‘बा साहित्यपुरषां म्हाराजा, उबा र्‍हा.. आज व्हया टिकानी साहित्याची गुढी उबारलीली हाय.. साहित्याचा तोरानं बांदलीला हाय.. पुस्तकांची पुंजा केलीली हाय.. ती मान्य करून घे. वाचनान्याला ढिगभर पुस्तकाचा वाचयाची वांशा देस.. लिवनार्‍यांच्या हातात ताकत देस.. बोलनार्‍याच्या त्वांडार सरस्वती नाचनं दे.. असा सगला बरा करून वडाची साल पिपलाक लाव.. उलट्याचा सरल कर.. अनी साहित्याची, वाचनाची गोडी लाव रे म्हाराजा..!’ असे संगमेश्वरी बोलीतील खणखणीत गार्‍हाणे जनसेवा ग्रंथालयाच्या साहित्यिक गुढीला घालण्यात आले.
गाडीतळ येथील जनसेवा ग्रंथालयातर्फे चौथ्या वर्षी साहित्यिक गुढी उभारण्यात आली. या वेळी हे गार्‍हाणे अमोल पालये यांनी घालण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांच्या हस्ते साहित्यिक गुढीचे पुजन आणि ग्रंथपुजन करण्यात आले. पालये यांनी साहित्यिक गुढी उभारण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. रत्नागिरीची साहित्य, वाचन चळवळ वाढीस लागावी यासाठी उभारली आहे. या गुढीची काठी ही लेखणीची प्रतिक आहे. लेखणीतून चांगले साहित्य, चांगले विचार प्रसवावेत, ही या गुढीची संकल्पना आहे.
रत्नागिरीतील चित्रकार आणि जनसेवाचे वाचक श्रीनिवास सरपोतदार यांनी नेहमीप्रमाणे साहित्यिक गुढीचे आकर्षण ठरणार्‍या साहित्य पताका यावर्षीही साकारल्या होत्या. यावर्षी पताकांवर नामवंत साहित्यिकांची नावे आणि त्यांची सुबक चित्रे त्यांनी स्वत: रेखाटली होती.
साहित्यिक मेघा कुलकर्णी यांनी कविता सादर केली. त्यानंतर ग्रंथालयात लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी आणि उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजसेविका श्रद्धा कळंबटे, जनसेवाचे सु. द. भडभडे, चित्रकार श्रीनिवास सरपोतदार, श्री. नानीवडेकर, आगाशे विद्यामंदिरच्या ग्रंथपाल आभा घाणेकर, ग्रंथपाल सिनकर, सुजाता कोळंबेकर, सौ. भोसले, आशा पाटणे आदी नागरिक, वाचक, सभासद उपस्थित होते.

-- बातमीदार- मकरंद पटवर्धन... २३.३.२०२३